मुंबईत रस्त्यांवर जैन धर्मगुरुंसाठी पांढऱ्या पट्ट्या; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, कडक शब्दात
Marathi June 10, 2026 12:25 PM

पांढऱ्या रेषेवरून मनसे मुंबई रोडवर मुंबईतील घाटकोपर-विद्याविहार परिसरातील कैलास अव्हेन्यू सोसायटीमध्ये जैन धर्मगुरू आणि साध्वींच्या आगमनासाठी रस्त्यावर पांढऱ्या रंगाची पट्टी (Jain Community White Line Controversy Mumbai) रंगवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.

जैन धर्मगुरू अनवाणी चालत असल्याने उन्हामुळे गरम झालेल्या रस्त्यावरून चालताना त्रास होऊ नये, यासाठी ही पांढरी पट्टी रंगवण्यात आली होती, असा दावा जैन समाजातील काही सदस्यांनी केला आहे. तसेच घाटकोपर पश्चिमेच्या बाजूला रस्त्यावर अनेक ठिकाणी सफेद पट्ट्या मारलेल्या दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर आता मनसेकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. (Jain Community White Line Controversy Mumbai)

मनसेचा इशारा, संदीप देशपांडे काय म्हणाले? (Sandeep Deshpande On White Line Controversy)

पांढऱ्या पट्ट्या मारून सांस्कृतिक दहशतवाद  परसवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची या पुढे तोंड काळी करण्यात येतील, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

नेमकं प्रकरण काय? (White Line Controversy In Mumbai)

सोशल मीडियावर गेल्या आठवडारापासून युट्यूबर प्रसाद वेदपाठक उचलून धरलेला वादाचा मुद्दा चांगलाच गाजत असून घाटकोपरमधल्या (Mumbai) सोसायटीचा हा वाद आहे. सोशल मीडियावर या वादावरुन वेगवेगळ्या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय. आपण राहत असलेल्या सोसायटीतील घटनेवर प्रसादनं संताप व्यक्त करत तीव्र नाराजी व्यक्त केलीय, त्याच्या या भूमिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली होती. कारण, सोसायटीमधील जैन कुटुंबीयांनी सोसायटीत कुणालाही न विचारता पांढरी पट्टी मारली होती. या पांढऱ्या पट्टीला सोयायटीमधील इतर सदस्यांनीही विरोध दर्शवला होता. माध्यमांनीही हा मुद्दा उचलून धरला होता. अखेर, आता ह्या पांढऱ्या पट्टीवर रंगकाम करण्यात आलं असून स्वत: प्रसादने याची माहिती दिली आहे.

प्रसाद वेदपाठकच्या सोसायटीत काही जैन समाजातील लोकांनी पांढऱ्या रंगाची पट्टी मारल्याची माहिती समोर आली. त्यावर प्रसादने प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, आपल्या सोसायटीच्या आवारात अशी पांढरी पट्टी मारण्यात आली, त्यावेळी सोसायटीतील सदस्यांची परवानगी कुणीच घेतलेली नाही, असा दावा त्याने केला आहे. प्रसादच्या माहितीनुसार, जैन धर्मगुरूंसाठी ही पट्टी आखण्यात आली आहे. धार्मिक मान्यता पाळायच्या असतील तर त्या घरी कराव्यात सार्वजनिक ठिकाणी असं प्रकारच्या कृत्यावर प्रसादनं आक्षेप नोंदवला होता. तसेच, हा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, त्यामळे ही पट्टी लवकरात लवकर हटवावी, अशी मागणीही त्याने केली होती. अखेर, प्रसादने ट्विटवरुन घटनेची माहिती देत, पांढऱ्या पट्ट्यांवर रंगकाम सुरू करण्यात आल्याचे सांगितले, त्याने फोटोही शेअर केला आहे. तसेच, माध्यमांनी दखल घेतल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

आता, माझ्याकडून वाद मिटलाय, विषय संपलाय; सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीवर अखेर रंगकाम, प्रसाद वेदपाठकची पोस्ट

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.