Darwish Rasooli: अफगाणिस्तानचा खेळाडू तातडीने मायदेशी परतला; वन डे मालिकेला सुरूवात होण्यापूर्वी त्याच्यावर कोसळला दुःखाचा
esakal June 12, 2026 10:45 PM

Darwish Rasooli Returns Home After Family Tragedy: भारत आणि अफगाणिस्तान(IND vs AFG ODI) यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यानंतर आता तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १३ जूनपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होत आहे, तर तिसरा आणि अखेरचा सामना २० जून रोजी खेळवला जाणार आहे.

मात्र, मालिका सुरू होण्यापूर्वीच अफगाणिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा धडाकेबाज फलंदाज दुःखद घटनेमुळे मायदेशी परतला आहे.

अफगाणिस्तानचा टॉप ऑर्डर फलंदाज दरविश रसूली याच्या वडिलांचे दुःखद निधन झाले आहे. ही बातमी मिळताच हा खेळाडू तातडीने मायदेशी रवाना झाला आहे. या दुःखद घटनेमुळे तो १३ जून रोजी भारताविरुद्ध होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्याला मुकणार आहे. तो पुढील सामन्यांसाठी परतणार की नाही, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

IND vs AFG: जडेजाची टीम इंडियात निवड का नाही? रिषभ पंत ऐवजी केएल राहुलकडे कसोटीचं उपकर्णधार का दिलं? आगकरांनी सर्व स्पष्टच सांगितलं

अफगाणिस्तानचा संघ सध्या पहिल्या सामन्यासाठी धर्मशाळा येथे सराव करत आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला रसूलीच्या अनुपस्थितीमुळे अफगाणिस्तानच्या रणनीतीला मोठा धक्का बसला आहे. नुकत्याच झालेल्या काही सामन्यांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. आता त्याच्या अनुपस्थितीत रहमानुल्लाह गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांच्यावर डावाची मोठी जबाबदारी असेल.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान वनडे मालिका वेळापत्रक

पहिला वनडे – शनिवार, १३ जून २०२६

स्थळ : एचपीसीए स्टेडियम, धर्मशाळा

वेळ : दुपारी १.३० वाजता

  • दुसरा वनडे – बुधवार, १७ जून २०२६

  • स्थळ : एकना स्टेडियम, लखनऊ

  • वेळ : दुपारी १.३० वाजता

  • तिसरा वनडे – शनिवार, २० जून २०२६

  • स्थळ : एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

  • वेळ : दुपारी १.३० वाजता

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिकेचा पहिला सामना १३ जून रोजी दुपारी १.३० वाजता सुरू होईल. तत्पूर्वी दुपारी १ वाजता नाणेफेक होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण जिओहॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

IND vs AFG: उद्यापासून वन-डेचा थरार! टीव्ही अन् मोबाईलवर LIVE मॅच कधी, कुठे पाहायची? जाणून घ्या वेळ

भारत संघ

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, प्रसिद्ध कृष्णा, श्रेयस अय्यर, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, हर्ष दुबे, इशान किशन, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव.

अफगाणिस्तान संघ

हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), सेदिकुल्लाह अटल, रहमानुल्लाह गुरबाज (यष्टिरक्षक), इक्रम अलीखिल (यष्टिरक्षक), अझमतुल्लाह ओमरझाई, बिलाल सामी, नांगेलिया खरोती, फरीद अहमद मलिक, एएम गझनफर, मोहम्मद नबी, रशीद खान, दरविश रसूली, इब्राहिम उर रहमान, शरीफुल्लाह आणि इब्राहिम झद्रान.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.