ALSO READ: लोणीकंद भागात अपघातात शाळकरी मुलीचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगरच्या सिल्कमिल परिसरात मालमत्तेच्या वादातून मुलाने वडिलांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वडिलांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या मुलीवर देखील आरोपीने हल्ला केला त्यात ती जखमी जाळी. सातारा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाच्या निर्णयांनंतर हा हल्ला करण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार,पीडित आणि त्यांच्या मुलामध्ये बराच काळापासून मालमत्तेवरून वाद होते. हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आणि निर्णय वडिलांच्या बाजूने लागला.
ALSO READ: चंद्रपूरमध्ये खडीने भरलेला ट्रक नाल्यात कोसळला, चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू
यानंतर, तहसील प्रशासन आणि पोलिसांच्या उपस्थितीत वादग्रस्त भूखंडाचा ताबा वडिलांकडे देण्यात आला. या निर्णयामुळे आरोपी नाराज होता.
सायंकाळी सुमारे ६:४५ वाजता, वडील भूखंडाचा ताबा घेऊन मुलीसह घरी परत येताना आरोपीने त्यांचा रिक्षेतून पाठलाग केला आणि त्यांच्या पुढे वाहन उभे केले आणि चाकूने वडिलांवर अनेक वेळा वार केले. वडिलांवर हल्ला करताना पाहून मध्यस्थी करण्यासाठी बहीण आली असता आरोपीने तिच्यावर देखील वार केले. गंभीर जखमी झालेल्या वडिलांना तातडीने रुग्णालयात दाखल केले परंतु उपचाराधीन असता त्यांचा मृत्यू झाला. आणि जखमी मुलीला देखील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ALSO READ: गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार; हजारो महिलांनी महामार्ग रोखला
घटनास्थळावरून फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी सातारा पोलिसांच्या पथकाने मोहीम सुरू केली. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मिटमिता भागातील एका नातेवाईकाच्या घरातून ताब्यात घेण्यात आले . त्याने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या होत्या आणि त्याला उपचारासाठी व्हॅली हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे.पोलीस पुढील तपास करत आहे.
Edited By - Priya Dixit