सेजल पवारला मोठा दणका… आता थेट निलंबन? मोठी अपडेट काय?
Tv9 Marathi June 12, 2026 10:45 PM

स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे अनेकांची अडचण वाढली आहे. या शोमध्ये डॉ सेजल पवार या तरूणीने मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्टवर जोक केला होता, यामुळे ती अडचणीत सापडली आहे. तसेच एक तरूणाने म्हटले होते की, ‘डेट’साठी तो एका तरूणीसोबत गेला आणि त्याने तिथे चिकन बिर्याणीवर 370 रुपये खर्च केले. नंतर त्याला तो खर्च ‘वसूल’ करायचा होता. यानंतर आता सेजल पवार, प्रणित मोरे आणि हिमांशू जांगडावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता सेजल पवारला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सेजल पवारचे निलंबन?

डॉ. सेजल पवार या विद्यार्थिनीने प्रणित मोरेच्या शोमध्ये अवयवदान आणि मृतदेह संबंधी वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर आता केईएम महाविद्यालयात शिकत असलेल्या डॉ. सेजल पवारवर महाविद्यालयाकडून लवकरच काही दिवसांच्या निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डॉ सेजल पवारने त्या कार्यक्रमात जे वक्तव्य केलं त्यामुळे समाजातील घटकांच्या भावना दुखावल्या आहेत. या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल केईएम रुग्णालय प्रशासनाने घेतली असून त्यासंबंधीचा अहवाल आज रात्रीपर्यंत दोन सदस्य समितीकडून मागविण्यात आला आहे

याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उद्या यासंबंधी कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे ज्यामध्ये काही दिवसांसाठी तिला कॉलेजमधून निलंबित केलं जाणार आहे. कॉलेज प्रशासनाने तिच्या आई-वडिलांना बोलून घेतले असून उद्या तिच्या कारवाई संबंधीचा निर्णय आई-वडिलांकडे दिला जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता आगामी काळात सेजलच्या अडचणी आणखी वाढल्याचे पहायला मिळत आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

डॉ. सेजल पवारने प्रणित मोरेच्या शोमध्ये रुग्णालयात आलेल्या डेड बॉडीचे प्रायव्हेट पार्ट पाहून जोक मारायचो, असं म्हटलं होतं. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. सायबर सेलने तिलाही चौकशीसाठी बोलावलं आहे. प्रणित मोरे, हिमांशू जांगडा यांनाही चौकशीसाठी समन्स बजावलं असून त्यांचं म्हणणं नोदंवलं जाणार आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असं महाराष्ट्र सायबर सेलने म्हटले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.