कोपर्डे हवेली : कऱ्हाड तालुक्यातील शहापूर गावचे सुपुत्र व लष्करातील जवान अर्जुन राजेंद्र जाधव यांना आज शहापूर येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
MPSC Success Story: पीएसआयची संधी हुकली, पण हार मानली नाही; अखेर MPSC मधून निळकंठ गुडपळे महसूल सहाय्यकपदाला गवसणी, जिद्दीने गाठले यश..आज सकाळी जवान अर्जुन जाधव यांचे पार्थिव त्यांच्या गावी शहापूर येथे आणण्यात आले. शोकाकूल वातावरणात त्यांचे पार्थिव पाहून कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटणारा होता. त्यांची आई, वडील, पत्नी, भाऊ यांनी फोडलेला हंबरडा उपस्थितांची मने हेलावून टाकणारा होता.
ग्रामस्थ व युवकांनी गावातील प्रमुख चौक, रस्ते आणि गल्लीबोळ देशभक्तीपर रांगोळ्यांनी सजले होते. ‘अर्जुन जाधव अमर रहे, भारत माता की जय’, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. उन्हाची तमा न बाळगता हजारो नागरिक अंत्ययात्रेत सहभागी झाले.
त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, नायब तहसीलदार राठोड, पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, जिल्हा परिषद सदस्या विद्या वेताळ, सदस्य लालासाहेब जगदाळे, पंचायत समितीच्या उपसभापती अनिता वेताळ, सदस्य सिद्धार्थ चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, मानसिंगराव जगदाळे, अजितराव पाटील, सरपंच अनिता मदने, संचालक सुनील जगदाळे, ग्रामसेवक मनीष पाटील, संपतराव इंगवले, महेश चव्हाण, शैलेश चव्हाण, विवेक चव्हाण, अजय थोरात, अमोल पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी हुतात्मा अर्जुन जाधव यांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. लष्कराच्या जवानांनी शस्त्र सलामी देत मानवंदना दिली.
अर्जुन जाधव यांच्या मागे वडील राजेंद्र जाधव, आई सुरेखा जाधव, वीरपत्नी सायली जाधव, दोन बहिणी, धाकटा भाऊ ऋषी जाधव असा परिवार आहे. ऋषी जाधव हे भारतीय नौदलात कार्यरत असून, सध्या सुटीवर गावी आले होते. अर्जुन जाधव यांचा मुलगा सर्वेश हा अवघा ११ महिने १७ दिवसांचा असून, वडिलांच्या पार्थिवाकडे निरागस नजरेने पाहणाऱ्या सर्वेशला पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. त्यांच्या पार्थिवाला त्यांचे धाकटे बंधू ऋषी जाधव यांनी मुखाग्नी दिला, त्या वेळी मुलगा सर्वेश त्यांच्या कडेवर होता.
MPSC Success Story भावाने उचलली शिक्षणाची जबाबदारी; बहिणीची जिद्दीच्या जोरावर MPSC मध्ये भरारी, पूजा घोडके यांचा प्रेरणादायी प्रवास.. स्मारक उभे करणारवीरमरण आलेल्या अर्जुन जाधव यांचे शहापूर गावी स्मारक उभे करण्यात येणार असून, या स्मारक उभारण्यासाठी आमदार मनोज घोरपडे, आमदार डॉ. अतुल भोसले, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह रामकृष्ण वेताळ यांनी सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे.