Farmer Loan Waiver: ४० लाख शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी; मात्र 'या' लाभार्थ्यांना लागू राहणार विशेष अट, फडणवीसांनी केले स्पष्ट
esakal June 13, 2026 11:45 AM

मुंबई: ‘‘कोणतीही निवडणूक नसताना आम्ही कर्जमाफी केलेली आहे. ४० लाख शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. मात्र, ज्यांना वारंवार कर्जमाफीचा फायदा मिळालेला आहे त्यांना एका ठराविक रकमेपर्यंतच कर्जमाफी मिळेल. उरलेले पैसे त्यांनी भरायचे आहेत,’’ अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

MPSC Success Story: पीएसआयची संधी हुकली, पण हार मानली नाही; अखेर MPSC मधून निळकंठ गुडपळे महसूल सहाय्यकपदाला गवसणी, जिद्दीने गाठले यश..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाच्या १२ वर्षपूर्ती निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी योजनाही राजकीय नाही. कोणतीही निवडणूक नसताना शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या हेतूने ही कर्जमाफी करण्यात आलेली असल्याचे आवर्जून सांगितले.

तसेच जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीसाठी माझ्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री यांची उपसमिती स्थापण्यात आली आहे. ही कर्जमाफीच्या अंमलबजावणीत ज्या अडचणी येतील त्यावर ही उपसमिती निर्णय घेईल, अशी माहितीही त्यांनी दिली. फडणवीस यंनी सांगितले, की ज्यांना वारंवार कर्जमाफीच्या लाभार्थींना ठराविक रकमेपर्यंतच माफी मिळेल, उरलेले पैसे त्यांनी भरायचे आहेत, हे एकमेव अट टाकली आहे. राज्यातील जिल्हा सहकारी बँका टिकण्याच्या दृष्टीने ही अट आवश्यक आहे. अन्यथा आपली बँकिंग यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त होईल, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

MPSC Success Story भावाने उचलली शिक्षणाची जबाबदारी; बहिणीची जिद्दीच्या जोरावर MPSC मध्ये भरारी, पूजा घोडके यांचा प्रेरणादायी प्रवास.. ‘पेरणीसाठी सूचना पाळाव्यात’

राज्यावर ‘एल निनो’चा मोठा परिणाम होणार असल्याची पुनरुच्चार मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.