*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀️ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार
☀️ सूर्योदय – ०६:००
☀️ सूर्यास्त – १९:०६
चंद्रोदय – २८:४३
⭐ प्रात: संध्या – ०४:४८ ते ०६:००
⭐ सायं संध्या – १९:०६ ते २०:१८
⭐ अपराण्हकाळ – १३:५१ ते १६:२८
⭐ प्रदोषकाळ – १९:०६ ते २१:१६
⭐ निशीथ काळ – ००:११ ते ००:५४
⭐ राहु काळ – ०९:१६ ते १०:५४
⭐ यमघंट काळ – १४:११ ते १५:४९
लाभदायक----
लाभ मुहूर्त– १४:११ ते १५:४९
अमृत मुहूर्त– १५:४९ ते १७:२७
विजय मुहूर्त— १४:४४ ते १५:३६
⏳ कार्यसिद्धी वेळा – ११:१४ ते १२:५९ | २१:१७ ते २२:४४
⚠️ कार्यनाशक वेळा – ०६:०० ते ११:१४ | १२:५९ ते २१:१७ | २२:४४ ते २४:००
मुंबई बंदर भरती/ओहोटी – भरती: ०३:५० ते १०:३७ | ओहोटी: १०:३७ ते १७:२९ | भरती: १७:२९ ते २३:०९ | ओहोटी: २३:०९ ते ०४:४७ पुढील दिवस
ग्रहमुखात आहुती – केतु (अशुभ)
अग्निवास – पृथ्वीवर १३:२१ पर्यंत नंतर आकाशात
️ शिववास – १३:२१ पर्यंत भोजनात असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे त्यानंतर श्मशानात असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे
शालिवाहन शक १९४८
संवत्सर पराभव
अयन – उत्तरायण
ऋतु – ग्रीष्म
मास – अधिक ज्येष्ठ
पक्ष - कृष्ण पक्ष
तिथी – त्रयोदशी (१३:२१ नं.) चतुर्दशी
वार – शनिवार
नक्षत्र – कृत्तिका (२३:१३ नं.) रोहिणी
योग – सुकर्मा (१५:०३ नं.) धृति
करण – वणीज (१३:२१ नं.) भद्रा
चंद्र रास – मेष(०६:२४ नं.) वृषभ
सूर्य रास – वृषभ
गुरु रास – कर्क
दिनविशेष – भद्रा १३.२१ ते २४.०९, शिवरात्रि, चतुर्दशी श्राद्ध, अमृतसिद्धियोग-सर्वार्थसिद्धियोग २३.१३ नं.
विशेषआपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्या हातून घडणाऱ्या बऱ्या-वाईट कर्मांचा हिशेब आपल्या खात्यावर जमा होत राहतो. आणि त्यातून जमा होणाऱ्या पाप-पुण्याची फळे भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो असे हिंदू धर्मातील तत्वज्ञान सांगते. असा पुनर्जन्म खरोखर मिळतो का? मिळाल्यास कोणत्या ठिकाणी, कोणत्या अवस्थेत मिळतो अशा शंका सामान्यतः प्रत्येकाच्या मनात उद्भवतात.
पुनर्जन्माविषयी भारतामध्ये प्राचीन काळापासून अनेक ग्रंथांमध्ये विविध अभ्यासकांनी आपली निरीक्षणे नोंदवली आहेत. अलीकडे तर पाश्चात्य जगातही अनेक तज्ज्ञांनी या विषयामध्ये सखोल अभ्यास करून त्याविषयी ग्रंथनिर्मिती केलेली दिसते. पुनर्जन्म ही एक अंधश्रद्धा आहे असं म्हणणारा एक वर्ग आणि दुसरीकडे या संकल्पनेला पुष्टी देणाऱ्या इतिहासातील काही वैशिष्ट्यपूर्ण घटना यांचा परामर्श घेऊन सविस्तर माहिती सांगणारा हा व्हिडिओ आम्ही घेऊन आलो आहोत. जाणून घेऊ या पुनर्जन्माचं रहस्य श्री. गौरव देशपांडे
https://youtu.be/M4yZN8XVKUw?si=ModnNsG-JHF7LYR-
शुभाशुभ दिवस - अशुभ दिवस
श्राद्ध तिथी - चतुर्दशी श्राद्ध
आजचे वस्त्र – निळे/काळे
स्नान विशेष – काळे तिल किंवा दारूहळद वनस्पतीचे चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे.
उपासना – शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण आणि ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा.
दान – सत्पात्री व्यक्तीस नीलमणि, काळे उडीद, तेल, तिळ, कुळिथ, लोखंड दान करावे
तिथीनुसार वर्ज्य – वांगे, मांस
दिशाशूल उपाय – दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा करण्यापूर्वी काळे उडीद खाऊन बाहेर पडावे.
चंद्रबळ – वृषभ , कर्क , सिंह , वृश्चिक , धनु , मीन — या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे