पंचांग -
शनिवार : ज्येष्ठ कृष्ण १३, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ५.५८ सूर्यास्त ७.१०, चंद्रोदय पहाटे ४.४१, चंद्रास्त सायंकाळी ५.२६, शिवरात्री, भारतीय सौर ज्येष्ठ २३ शके १९४८.
दिनविशेष -
२००४ - भारत आणि रशियाची संयुक्त निर्मिती असलेल्या ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्राची चंडीपूरच्या तळावर यशस्वी चाचणी.
२०१० - भारताची अव्वल बॅडमिंटनपटू साईना नेहवालने भारतीय खुल्या ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेत मलेशियाच्या म्यू चू वाँग हिला पराभूत करून महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.
२०१४ - महाराष्ट्र सरकारने ठाणे जिल्ह्याचे विभाजन करत नव्या पालघर जिल्ह्याची घोषणा केली.