Talegaon Chakan Shikrapur Highway: तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग प्रकल्पाला वेग; ५४ किमी मार्गाचे काम डिसेंबरपासून, भूसंपादन दोन महिन्यांत
esakal June 13, 2026 02:45 PM

-हरिदास कड

चाकण : तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाच्या कामासाठी भूसंपादन प्रक्रिया येत्या दोन महिन्यात सुरु होणार आहे . यावर्षी डिसेंबर महिन्यात तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाचे काम संबंधित ठेकेदार कंपनी सर्व कार्यवाही झाल्यानंतर सुरू करेल अशी माहिती महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाचे (एमएसआयडीसी) मुख्य अभियंता रणजीत हांडे यांनी "सकाळ" ला दिली.

MPSC Success Story: पीएसआयची संधी हुकली, पण हार मानली नाही; अखेर MPSC मधून निळकंठ गुडपळे महसूल सहाय्यकपदाला गवसणी, जिद्दीने गाठले यश..

तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाचे सुमारे ५४ किलोमीटरचे काम होणार आहे. तळेगाव ते चाकण रासे फाटा या सुमारे २४ किलोमीटर अंतरावर चार पदरी उन्नत मार्ग(उड्डाणपूल) होणार आहे. त्यानंतर उन्नत मार्गाच्या खाली चार पदरी मार्ग तसेच रासे फाटा ते शिक्रापूर असा चार पदरी जमिनीवर मार्ग होणार आहे. या महामार्गाचे काम मोंन्टेकार्लो कंपनीने घेतलेले आहे. या कंपनीला वर्कऑर्डर लवकरच मिळेल.

या कंपनीबरोबर कामाबाबतच्या कराराला राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाच्या कामाला हिरवा कंदील दिला आहे. चाकण, तळेगाव येथील तसेच चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे. या मार्गाचे काम व्हावे अशी मागणी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे, किरण ढोकणे, पत्रकार हरिदास कड,गणेश डावरे यांनी मुख्य अभियंता हांडे यांना प्रत्यक्ष भेटून याबाबतच्या रस्त्याच्या कामाबाबत नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेऊन चर्चा केली.

तळेगाव चाकण शिक्रापूर या महामार्गासाठी भूसंपादन होणार आहे. हे भूसंपादन मावळ , खेड शिरूर तालुक्यात होणार आहे.त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. ठेकेदार कंपनीला कामाची वर्कऑर्डर देण्यात आलेली नाही ही वर्क ऑर्डर लवकर मिळेल. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने या कंपनीसोबतच्या कराराला मंजुरी दिलेली आहे . या मार्गाचे काम साधारणपणे येत्या डिसेंबर पासून चालू होईल .ही कंपनी या मार्गाचे पूर्ण काम साधारणपणे अडीच वर्षाच्या कालावधीत करेल. या मार्गावरील खेड तालुक्यातील तीन पूल धोकादायक आहे याबाबत "सकाळ" ने वृत्त दिले होते त्याची दखल घेतलेली आहे असे मुख्यअभियंता हांडे यांनी सांगितले.या कामाला सुरुवात झाल्यानंतर पुलांची कामेही करण्यात येतील. या महामार्गावरील शेलपिंपळगाव पुलाचे मोठे काम आहे.असे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे मुख्य अभियंता हांडे यांनी सांगीतले.

MPSC Success Story भावाने उचलली शिक्षणाची जबाबदारी; बहिणीची जिद्दीच्या जोरावर MPSC मध्ये भरारी, पूजा घोडके यांचा प्रेरणादायी प्रवास..

तळेगाव चाकण शिक्रापूर या महामार्गासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनासाठी जमीन मालकांना आज नोटीस मिळाल्या असल्याचे खालुंब्रे येथील बाधित जमीन मालक भानुदास गाडे यांनी सांगीतले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.