विधान परिषद निवडणुकीसाठी AICC च्या सूचनांकडे राज्यातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांची पाठ; काँग्र
Marathi June 16, 2026 11:25 AM

विधान परिषद निवडणूक 2026: राज्यातील विधान परिषद निवडणुकांमध्ये जवळपास सर्वच ठिकाणी काँग्रेसची (Congress) पीछेहाट होताना दिसत आहे. प्रत्येक ठिकाणी उमेदवार कुणी माघार घेत आहे, तर कुठे उमेदवाराला निवडणुकीत अजिबात रस नसल्याचं दिसत आहे. मात्र या मागील कारण आता समोर येत आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, AICC ने दिलेल्या सक्त सूचनानुसार राज्यातील विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election 2026) राज्यातील बड्या नेत्यांनी , त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी अथवा जवळच्या कार्यकर्त्यांनी उतरावे, अशा सूचना केलेल्या होत्या. यामागे AICC चा उद्देश होता की, ही निवडणूक पैशांची आहे, मोठा माणूस निवडणुकीत असला तर निवडणुकीला महत्त्व येईल! मात्र काँग्रेसचा हाय कमांड असलेल्या AICC च्या सूचनांकडे राज्यातील जवळपास सर्वच बड्या नेत्यांनी पाठ फिरवल्याच दिसत आहे. आणि त्यामुळे राज्यात विधान परिषदेसाठी अतिशय नवखे तर कुठे अनोळखी उमेदवार दिल्याने काँग्रेसला अनेक ठिकाणी तोंडावर आपटावं लागलंहे. (महाराष्ट्राचे राजकारण)

Maharashtra Congress : अनेक बड्या नेत्यांना निवडणुकीत प्रत्यक्ष सहभागी व्हावं, AICC सूचना, पण….

दरम्यानखात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगलीसातारा येथे विश्वजीत कदम यांनी त्यांच्या घरातील उमेदवार द्यावा, लातूर सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे आणि अमित देशमुख यांनी त्यांच्याच परिवारातील किंवा जवळचा कार्यकर्ता उमेदवार देऊन निवडणूक लढवावी, अमरावतीत स्वतः यशोमती ठाकूर यांनी निवडणूक लढवावी, नागपूरमधून नितीन राऊत यांनी त्यांचा जवळचा नातेवाईक किंवा कार्यकर्ता निवडणुकीत उतरावावा, चंद्रपूर मध्ये विजय वडेट्टीवार यांनी आपल्या जवळचा नातेवाईक किंवा कार्यकर्ता उभा करावा. याव्यतिरिक्त इतर अनेक बड्या नेत्यांना निवडणुकीत प्रत्यक्ष सहभागी व्हावं, अशा सूचना AICC ने दिल्या होत्या. मात्र सर्वच ठिकाणी बड्या नेत्यांनी पाठ फिरवत नवख्या व अनोळखी उमेदवारांना उमेदवारी दिल्याने विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसला अनेक ठिकाणी तोंडघशी पडाव लागल आहे. आणि त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची पीछेहाट होत असल्याचे कारण विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Congress : काँग्रेसच्या पीछेहाटीवर राज्यातीलच बड्या नेत्यांवर संशय

याचा अर्थ असाच की राज्यातील काँग्रेसचे बडे नेते हे स्वतःहूनच विधान परिषद निवडणुकीत उतरलेच नाही. त्यामुळे आता राज्यातील काँग्रेसच्या पीछेहाटीवर राज्यातीलच बड्या नेत्यांवर संशय व्यक्त होत आहे. काँग्रेसच्या एका वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार AICC च्या सूचनांचं पालन झालं असतं तर विधान परिषद निवडणुकीत चित्र काही वेगळं असतं. मात्र काँग्रेसच्या पीछेहाटी मागे काँग्रेसच्याच बड्या नेत्यांनी पाठ फिरवल्याचं एक कारण आहे. असं समोर येत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.