अमेरिका युद्धासाठी डासांना 'मारेकरी' बनवत होती.
Marathi June 16, 2026 11:25 AM

सैनिकांवर गुप्त परीक्षण

पेंटागॉनचे काही गुप्त दस्तऐवज सार्वजनिक झाले असून ते शीतयुद्धादरम्यान अमेरिकेने संक्रामक आजारांनी युक्त डासांना जैविक अस्त्राच्या स्वरुपात वापरण्याचा धोकादायक प्रयोग केला होता याची पुष्टी देतात. पेंटागीनच्या लायब्रेरी डिफेन्स टेक्निकल इन्फॉर्मेशन सेंटरच्या वेबसाइटवर एक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. यात अमेरिकेच्या सैन्याने ‘प्रोजेक्ट बेलवेदर’ नावाने गुप्त कार्यक्रम राबविल्याचे आणि याच्या अंतर्गत वाळवंटी स्थितीत डासांच्या माणसांना चावण्याच्या क्षमतेचे परीक्षण करण्यात आले होते. सप्टेंबर अन् ऑक्टोबर 1959 दरम्यान करण्यात आलेल्या या परीक्षणांचा मुख्य उद्देश डास शत्रूसैनिक किंवा लोकसंख्येच्या विरोधात घातक अस्त्राच्या स्वरुपात सोडले जाऊ शकतात का हा होता.

या गुप्त अन् संवेदनशील अभियानासाठी सैन्य संशोधकांनी विशेष स्वरुपात एडीज एजिप्टी प्रजातीच्या डासांची निवड केली होती. हीच प्रजाती माणसांना स्वत:ची शिकार करते आणि जिका व्हायरस, डेंग्यू, यलो फीवर आणि चिकनगुनिया यासारख्या आजारांचा फैलाव करण्यासाठी ओळखली जाते. पारंपरिक क्षेपणास्त्र अन् बॉम्बच्या तुलनेत ही जैविक पद्धत अत्यंत गुप्त अन् शत्रूला पूर्णपणे पंगू करणारी होती असे अमेरिकेच्या सैन्य जनरल्सचे मानणे होते.

ऑपरेशन बिग बज अन् ड्रॉप किक

1950 च्या दशकाच्या मध्यात अमेरिकेकडून अनेक मोठे डास प्रकल्प चालविले जात होते, ज्यात ऑपरेशन बिग बज आणि ऑपरेशन ड्रॉप किक सामील होते. 1955 मध्ये ऑपरेशन बिग बज अंतर्गत अमेरिकेच्या सैन्याने जॉर्जियाच्या सवानामध्ये ‘कार्वर व्हिलेज’ नावाच्या एका अश्वेतबहुल नागरी वस्तीच्या वर विमानांमधून सुमारे 3 लाख येलो फीवरयुक्त डासांना हवेत सोडले होते. हे डास आकाशातून पाडविण्यात आल्यावरही जिवंत राहू शकतात का हे पडताळण्यासाठी हे अमावनीय परीक्षण करण्यात आले हेते.

शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेच्या सैन्याने ऑपरेशन ड्रॉप कीक घडविले, याद्वारे डासांना शस्त्रांच्या डिलिव्हरी सिस्टीमच्या रुपात पूर्णपणे विकसित केले जाऊ शकते का हे पाहिले गेले. या कार्यक्रमाच्या अंतर्गत कोट्यावधी डासांचे कृत्रिम स्वरुपात प्रजनन करविण्यात आले. त्यांना खुल्या मैदानात सोडून संशोधकांनी त्यांचे प्रवासाचे अंतर, विपरित स्थितीत जिवंत राहण्याचा कालावधी आणि माणसांना सोडून चावण्याच्या त्यांच्या सवयींचे बारकाईने अध्ययन केले होते. परंतु कूटनीतिक दबावापासून वाचण्यासाठी या फील्ड टेस्ट्सदरम्यान डासांना थेट स्वरुपात संक्रमित करण्यात आले होते. परंतु प्रसंगी या डासांमध्ये त्वरित घातक व्हायरस लोड करत त्यांना युद्धभूमीवर पाठविण्याची तयारी केली जात होती. हे डास हवाई लँडिंगमध्ये वाचण्यासोबत माणसांना शोधण्यासह अत्यंत तरबेज असल्याचे अमेरिकन केमिकल  कॉर्प्सच्या वैज्ञानिकांना आढळून आले होते.

लाइव्ह ट्रायल

ऑपरेशन बिग बजमधून प्राप्त निष्कर्षांना पुढे नेत उटाहच्या डगवे प्रोविंग ग्राउंड नावाच्या अत्यंत कोरड्या अन् खुल्या वाळवंटी भागात 52 लाइव्ह ट्रायल करण्यात आले होते. या परीक्षणांमध्ये स्वेच्छेने या प्रयोगात सामील होण्याची सहमती देणाऱ्या अमेरिकेच्या सैनिकांना सामील करण्यात आले होते. या परीक्षणादरम्यान सैनिकांना छोट्या छोट्या समुहात वाळवंटात बसविले जात होते, मग त्यांच्यावर भूकेल्या डासांना सोडले जात होते. 10 सैनिकांच्या समुहात केवळ 100 डास सोडण्यात आल्यावरही प्रत्येक सैनिकाला सरासरी 40 वेळा चावण्यात आल्याचे निष्कर्षांमधून दिसून आले होते. किलर मच्छर जोरदार वारे, अधिक तापमान आणि तीव्र उन्हाचा मारा झेलू शकत होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.