भाजपच्या झाडावर बसलेत म्हणून वनमंत्री गणेश नाईकांचे माकड चाळे, प्रकाश महाजन भडकले; म्हणाले…
Marathi June 16, 2026 03:25 PM

गणेश नाईकांवर प्रकाश महाजन : भाजपच्या (BJP) झाडावर बसलेत म्हणून वनमंत्री गणेश नाईकांचे (Ganesh Naik) माकड चाळे सुरू आहेत. वनमंत्र्यांनी माकड चाळे थांबवावेत, असं म्हणत शिवसेना प्रवक्ते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांni गणेश नाईकांवर जहरी टीका केली आहे. दुसऱ्याची उंची कमी केली म्हणून ती कमी होत नसते. असेहे ते म्हणाले. ठाणे येथील कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांना नाव टाळल्याने प्रकाsh महाजन हे आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. लोकप्रतिनिधींचे नाव टाळल्यामुळे आयुक्तांना नोटीस बजावायला हवी, असेही महाजन म्हणाले. गणेश नाईक यांनी यापूर्वीही बिबट्या बंदोबस्त करण्यासाठी शेळ्या सोडण्याचे फर्मान काढले होते. त्यावरूनही प्रकाश महाजन यांनी लक्ष्य करत टीका केलीहे.

दरम्यानशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार फुटणार आणि ते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. रविवारी ‘मातोश्री’ (Matoshree) वर झालेल्या बैठकीला केवळ 5 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर 4 खासदार ऑनलाइन (Online) जोडले गेले होते. यानंतर खासदार संजय देशमुख यांनी दिल्ली गाठून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. या सर्व घडामोडींवर बोलतानाही प्रकाश महाजन म्हणाले तेडॉक्टरराणच्या मनात आलं की योग्य वेळी ऑपरेशन होणार. असं म्हणत त्यांनी ऑपरेशन टायगरवरून सूचक वक्तव्य केलं.

Shivsena vs Shivsena UBT: 60 व्या वर्धापन दिनानिमित्य दोन्ही शिवसेनेकडून जय्यत तयारी

वर्धापन दिनानिमित्त एकनाथ शिंदेंची शिवसेना मुंबईत मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटर येथे शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी गोरेगाव नेस्को येथे शिंदेंच्या शिवसेनेचे मुंबईतील आमदार नगरसेवक आणि पदाधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीत यंदाच्या वर्धापन दिवसाला मोठं शक्ती प्रदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नगरसेवक आणि आमदारांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच यंदाच्या वर्धापन दिनी जिल्हा परिषद, विधान परिषद आणि पंचायत समितीत निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार केला जाईल. मात्र, चर्चा आहे ती “ऑपरेशन टायगरची”, वर्धापन दिनाला ठाकरेंच्या सेनेतील काही खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार का ? याची जोरदार चर्चा रंगली आहे.

तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुरु आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा षण्मुखानंद सभागृहात वर्धापन दिन साजरा होणार आहे. खासदारांच्या फुटीच्या चर्चेवर आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तसेच  ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व नऊ खासदार वर्धापन दिली तरी उपस्थित राहणार का? याकडे विशेष लक्ष असेल.

मराठी VS Ganesh Naik : नेमकं काय आहे प्रकरण?

नवी मुंबई महानगर पालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात पुन्हा कलगीतुरा रंगला आहे. नवी मुंबई मनपातर्फे उद्या वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते विविध आरोग्य विषयक सुविधांचा उद्घाटन सोहळा होणार आहे. मात्र कार्यक्रम पत्रिकेवर उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नावचं छापलेलं नाही. नवी मुबंईत उद्या आरोग्य सेवा कामांचा लोकर्पण सोहळा आहे. या कार्यक्रमात आमदार व वनमंत्री गणेश यांचं नाव आहे तसेच खासदार नरेश म्हस्के आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव आहे. मात्र ठाणे जिल्हाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव नवी मुबंई पालिकेच्या पत्रिकेत नाही. नवी मुबंईच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना डावललं गेल्याच्या चर्चा आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.