वाढतं वजन आणि पोटाभोवती जमा होणारी चरबी (Belly Fat) कमी करणं हे सध्या अनेकांसाठी एक मोठं चॅलेंज बनलं आहे. अयोग्य आहार, बैठेकाम आणि मानसिक तणाव यामुळे बेली फॅट झपाट्याने वाढते. पोटाची ही चरबी केवळ दिसायलाच खराब दिसते असे नाही, तर ती आरोग्यासाठीही तितकीच घातक ठरू शकते. या समस्येवर ‘योग’ हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. आज आपण बेली फॅट कमी करण्यासाठी कोणती योगासने करणे फायद्याचे ठरेल हे जाणून घेऊयात.
धनुरासन
खूप जास्त वेळ एकाच ठिकाणी काम करत बसल्याने पाय आणि खांद्यांमध्ये होणारा कडकपणा दूर करण्यासाठी धनुरासन करणे फायद्याचे ठरेल. हे आसन केल्याने पोटाच्या खालच्या भागातील स्नायू खेचल्यासारखे होतात, जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
हेही वाचा – International Yoga Day : शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य निरोगी ठेवणारा योगाभ्यास
नौकासन
बेली फॅट कमी करण्यासाठी नौकासन करता येईल. या आसनाच्या सरावाने बेली मसल्स संकुचित होतात, ज्यामुळे फॅट बर्न होण्यास सुरूवात होते.
भुजंगासन
पोटाच्या स्नायूंचा चांगला व्यायाम होण्यासाठी भुजंगासन करावे. या आसनाच्या सरावाने पचनक्रिया सुधारते आणि पाठही मजबूत होते.
कुंभकासन
ओटीपोटाच्या येथे जमा झालेली चरबी दूर करण्यासाठी कुंभकासन करणे उपयुक्त ठरेल. हे योगासन केल्याने ब्लड सर्कुलेशन सुधारते. हे पोटाची चरबी कमी करण्यासाठी आणि कोअर मजबूत करण्यासाठी सर्वोत्तम आसन मानले जाते.
हेही वाचा – रात्री उशीरा जेवण केल्याने वाढतो या आजारांचा धोका





