Maharashtra News Live Update: निवडणुकीआधी लाडकी बहीण.... आणि नंतर ८० लाख महिलांना अपात्र ठरवले. - उद्धव ठाकरे
Saam TV June 20, 2026 01:45 AM
निवडणुकीआधी लाडकी बहीण....आणि नंतर ८० लाख महिलांना अपात्र ठरवले.

शिवसेनेच्या 60 वा वर्धापन दिनीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच शिवसैनिकांचा उत्साह वाढवला.

नेहमीप्रमाणे भाषणाची सुरुवात केली असली तरी आज विशेष म्हणजे, तुम्हाला सगळ्यांना

उद्देशून ...जमलेल्या माझ्या हिऱ्यापेक्षा मौल्यवान, शिवसैनिकांनो....

कोणी माय का लाल हे देणगी माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.

दुखी आणि कष्टाने खचून गेलेला शिवसैनिक दिसेल असे वाटले असेल, पण शिवसैनिक खचला नाही उलट पेटलेला आहे.

गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; 11 लाखांचा अवैध दारूसाठा व स्कॉर्पिओ जप्त

गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असताना अवैध दारू वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पेंढरी उपपोस्टे हद्दीत सापळा रचून पोलिसांनी स्कॉर्पिओ वाहनातून वाहतूक करण्यात येणारा अवैध देशी-विदेशी दारूसाठा जप्त केला.

मोबाईल,सोने अर्ध्या किमतीत देतो सांगून फसवणाऱ्या ठगाला पोलिसांनी केली अटक

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये अर्ध्या किमतीत मोबाईल आणि सोनं देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे.

श्रीकांत शिंदे नेस्को सेंटरमध्य दाखल

शिवसेनेच्या 60 वा वर्धापन दिनानिमित्त शिंदेसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली असून खासदार श्रीकांत शिंदे हे नेस्को सेंटरमध्ये दाखल झाले आहेत.

एकनाथ शिंदे नेस्को सेंटरकडे रवाना

शिवसेनेच्या 60 वा वर्धापन दिनानिमित्त एकनाथ शिंदे हे गोरेगावच्या नेस्को सेंटरकडे रवाना झाले असून ते काय भाषण करता हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

अंबरनाथमध्ये टेंडर प्रक्रिया रखडली; ३९ विकासकामे प्रतीक्षेत

अंबरनाथ शहरातील विकासकामांना टेंडर प्रक्रिया रखडल्यामुळे ब्रेक लागला आहे. निवडणुकीपूर्वी रस्ते, गटारे, नाले, उद्याने आदी ३९ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. महिनाभरापूर्वी टेंडर प्रक्रिया सुरू झाली, मात्र विधानपरिषदेच्या आचारसंहितेमुळे ती थांबली. सध्या १० कामांचे तांत्रिक देकार उघडण्यात आले असून वित्तीय देकार अद्याप बाकी आहेत. काही ठेकेदारांच्या सहभागामुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला असून सर्व टेंडर तातडीने उघडून विकासकामांना गती द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

गिरणा डावा कालवा कामाविरोधात शेतकरी आक्रमक; लखमापूरमध्ये अर्धनग्न आंदोलन

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील लखमापूर येथे गिरणा डावा कालवा विस्तारीकरण व अस्तरीकरणाच्या कामाविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. संतप्त शेतकऱ्यांनी कामासाठी आलेले जेसीबी माघारी पाठवत काम बंद पाडले आणि अर्धनग्न आंदोलन सुरू केले. नारपार योजनेचे पाणी प्रथम गिरणा नदीपात्रात सोडावे, त्यानंतरच कालवा विस्तारीकरण करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. प्रशासनाने मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी तीव्र घोषणाबाजी केली. आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

नीट पेपरप्रकरणी पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नीट पेपरप्रकरणाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढला. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याविरोधात आंदोलन करण्यात आले. वंचित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने एनटीएवर गंभीर आरोप करत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला. तसेच एनटीए बरखास्त करून धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

भिवंडीत इलेक्ट्रिक सामान वाहून नेणाऱ्या ट्रकला आग

भिवंडी तालुक्यातील अंजूर फाटा चिंचोटी रस्त्यावरून चिंचोटी च्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला अचानकपणे आग लागल्याची घटना घडली असून सद्यस्थितीत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार,अंजूर फाटा चिंचोटी रस्त्यावरून इलेक्ट्रिक बॅटरया आणि विविध इलेक्ट्रिक वस्तूंनी भरलेला ट्रक चिंचोटी च्या दिशेने जात असताना ट्रक पायगाव हद्दीत असताना ट्रकला अचानकपणे आग लागली.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक; मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित

मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित असून कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली जात आहे.

पिंपरी चिंचवड शहरात आजपासून पाणी पुरवठ्यात 15 टक्के पाणी कपात

पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारा पवना धरणात फक्त 20 टक्के पान पाणीसाठा शिल्लक असल्याने, पिंपरी चिंचवड शहराला होणारा पाणीपुरवठा कपात करण्याचा निर्णय पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांनी घेतला आहे. आज पासून पिंपरी-चिंचवड शहराला होणारा पाणीपुरवठ्यात 15 टक्के कपात केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असा आव्हान पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडून करण्यात आल आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत ९ उमेदवारांना दिलासा

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील अपील अर्जांवरील सुनावणी पूर्ण झाली असून १० पैकी ९ अपील मंजूर करण्यात आली आहेत. आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार तसेच कन्नडच्या आमदार संजना उर्फ रंजना जाधव यांच्यासह ९ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. मात्र, गंगापूर तालुक्यातील इंदुमती साहेबराव पाटील यांचा अर्ज फेटाळण्यात आला. या निर्णयामुळे निवडणुकीतील राजकीय समीकरणांना वेग आला आहे.

Sanjay darekar : बंडखोर खासदारांनी केलेले आरोप खोटे : आमदार संजय देरकर

ठाकरेसेनेचे सहा खासदार फुटीच्या उंबरठ्यावर असताना आता 14 आमदार फुटणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहेत.बंडखोर खासदारांनी उद्धव ठाकरे भेटत नाहीये. आदित्य ठाकरे दौरे करीत नसल्याचा आरोप केलाय. यावर ठाकरे सेनेचे वणीचे आमदार संजय देरकर यांनी प्रतिक्रिया दिली. बंडखोर खासदारांनी केलेले आरोप खोटे आहे, असं म्हणत दरकेर यांनी प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत यांनी शिवीगाळ केल्याने काही फरक पडत नाही - भरत गोगावले

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवीगाळ करत बंडखोर खासदारांवर संताप व्यक्त केला. यावर भरत गोगवले म्हणाले, त्यांनी शिवी देऊन त्यांची तोंड खराब होत आहेत. आम्हाला त्याने काही फरक पडत नाही, अडचण येणार नाही'.

 bharat gogawale : आत्तापर्यंत महायुती सरकारने मदत केली आहे, जस संकट येईल तशी मदत करणार - मंत्री भरत गोगावले

भात पेरणीचा नक्षत्र निघून गेला तरी पावसाचा पत्ता नाही, शेतकरी हवालदिल झाला आहे यावर बोलताना मंत्री भरत गोगावले यांनी " जस संकट येईल तशी मदत करणार " अशा अश्वासक शब्दात शेतकऱ्यांना मदतीच अश्वासन दिलं आहे.

Nashik : नाशिकच्या मनमाड नगरपरिषदेची उद्या पोटनिवडणूक 

नाशिकच्या मनमाड नगरपरिषदेच्या रिक्त असलेल्या जागेवर उद्या पोटनिवडणूक होत आहे. प्रभाग क्रमांक १० मधील ठाकरे गटाच्या नितीन वाघमारे याचे निवडणूक काळात निधन झाले होते. त्यामुळे ही पोटनिवडणूक होत असून,प्रभागातील अ व ब या ठिकाणचे मतदान पार पडणार आहे. उद्या होत असलेल्या निवडणूकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून,पाच केंद्रांसाठी कर्मचा-यांना मतदान साहित्य, यंत्राचे वाटप करण्यात आले आहे. तर हा प्रभाग संवेदनशील असल्याने मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात येणार आहे.

pune : पुणे-नाशिक रेल्वे मार्ग बदलल्याप्रकरणी आढळराव पाटलांचा खासदार कोल्हेंवर हल्लाबोल 

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाचा मूळ मार्ग बदलण्याच्या निर्णयावरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटीलांनी पत्रकार परिषदेतून खासदार अमोल कोल्हे यांच्यावर खापर फोडलं आहे.

मी मोठ्या धर्म संकटात आहे,इमोशनली विचार केला तरपाऊल चुकीचे वाटते, पण ...  - ओमराजे निंबाळकर 

मी मोठ्या धर्म संकटात आहे,इमोशनली विचार केला तर पाऊल चुकीचे वाटते, पण पॉलिटिकल विचार केला तर तेच बरोबर आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.

वाकचौरेंना मतदारसंघात फिरू देणार नाही...ठाकरे सेनेचा इशारा.. श्रीरामपूरमध्ये रास्तारोको 

शिर्डी लोकसभा मतदारसंघात खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात ठाकरे सेना आक्रमक झाली असून, त्यांना मतदारसंघात फिरू न देण्याचा इशारा देण्यात आलाय.. तर वाकचौरे यांच्या समर्थनार्थ आता शिंदेंची शिवसेना मैदानात उतरली असून, खासदार वाकचौरेंना विरोध केला तर आम्ही ढाल बनून उभे राहू.. आमच्या कार्यकर्त्यांनी बांगड्या घातलेल्या नाहीत असा इशारा शिंदे सेनेचे आमदार अमोल खताळ यांनी दिला आहे.

मुंबईत पाऊस, मुंबईकरांना दिलासा 

अखेर मुंबईत पावसाचं आगमन झालेलं आहे. चर्चगेटमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.

खाजगी ट्रॅव्हल्स मधील वाहकाची मुजोरी, ट्रॅव्हल्स मधील महिला प्रवासी महिलेला उद्धट बोलून मारहाण करण्याचा प्रयत्न 

पिंपरी चिंचवड शहरात खाजगी ट्रॅव्हल्स मधील एका चालकाची मजुरी पाहायला मिळाली आहे. एका खाजगी कंपनीच्या ट्रॅव्हल्स मधील वाहकाने त्याच्या ट्रॅव्हल्स मध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेशी मुजोरी करत तिला मारहाण करण्याचा प्रयत्न केला आहे. सागर जगताप असं या उद्धट ट्रॅव्हल्स मधील वाहकाचे नाव आहे .

शिवसेना उबाठाने 6 खासदार शिंदे गटात गेल्याबद्दल सोलापूरच्या गणपती घाटात केला दशक्रिया विधी

महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सहा खासदार हे शिंदे गटात गेल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ माजली आहे.शिवसेना (UBT) पक्षाच्या ९ पैकी ६ लोकसभेच्या खासदारांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील अधिकृत शिवसेनेत प्रवेश केल्याची किंवा स्वतंत्र गट स्थापन करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

घाटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला गेली पाच दिवसांपासून ठोकले ग्रामस्थांनी कूलूप 

घाटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला गेली पाच दिवसांपासून ठोकले ग्रामस्थांनी कूलूप.

घाटेवाडी येथे पदस्थापना आसलेले शिक्षक दुसऱ्याच शाळेवर काम करत आहेत.

आम्हाला तात्काळ शिक्षक देण्यात यावा .

रिक्त जागेवर शिक्षक अदयापनासाठी तात्काळ देण्यात यावा, आशी ग्रामस्थांची माघणी.

कधी उघणार शाळा,प्रशासनाचे उदयाप दुरलक्ष

दोडामार्ग विर्डी धबधब्याच्या खोल जलकुंडात पर्यटक बुडाला

​दोडामार्ग विर्डी येथील प्रसिद्ध वझर धबधब्याच्या खोल जलकुंडात पोहताना कर्नाटकातील धारवाड येथील पर्यटक बुडाला आहे. विजय दोडमणी असे या युवकाचे नाव आहे. ​धारवाड येथील काही युवकांचा गट गुरुवारी सकाळी विर्डी येथे वझर धबधब्याचे सौंदर्य अनुभवण्यासाठी आला होता.

इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या बिलाआड कोट्यवधींच्या विदेशी दारूची तस्करी उघड

इलेक्ट्रॉनिक साहित्याची वाहतूक असल्याचा बनाव करून गोव्याहून महाराष्ट्रात कर चुकवून विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. भिवंडी विभाग आणि कल्याण भरारी पथकाने संयुक्त कारवाई करत नाशिक–मुंबई महामार्गावर एका कंटेनरमधून तब्बल 1,620 बॉक्स विदेशी मद्य जप्त केले.

पेपर फुटी प्रकरणानंतर नीट परीक्षेच्या केंद्रावर परीक्षेवेळी आता पोलिसांची नजर
  • पुणे शहरातील परीक्षा केंद्रावर नीट परीक्षेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार

  • प्रत्येक परीक्षा केंद्रावर वीस पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे

  • पुणे जिल्ह्यात 36 तर शहरात 27 परीक्षा केंद्रावर नीट परीक्षा 21 जूनला होणार आहे

  • सर्व केंद्रांची पाहणी संबंधित पोलीस उपायुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी केली असून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला आहे

भीमाशंकरमध्ये विनापास दर्शनाला प्रतिसाद; वाढत्या गर्दीमुळे अनेक भाविक दर्शनाविना परतण्याची वेळ

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये सकाळी ७ ते ११ या वेळेत विनापास दर्शन सुरू करण्यात आले आहे. मात्र दर्शनासाठी केवळ चार तासांची मुदत आणि वाढती गर्दी यामुळे अनेक भाविकांना दर्शन न घेता परतण्याची वेळ येत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

पंढरपूर कॉरिडॉर च्या कामाला प्रशासकीय मान्यता; 3 993 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये उज्जैन आणि काशीच्या धर्तीवर कॉरिडॉर तयार केला जाणार आहे या कॉरिडरला काल राज्य सरकारने अंतिम प्रशासकीय मान्यता दिली आहे या कामासाठी 3997 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त

नंदुरबार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने म्हसावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुगनी गावात मोठी कारवाई केली आहे. बनावट देशी दारू तयार करणाऱ्या एका कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी एकूण 10 लाख 17 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, लक्ष्मण पाडवी या आरोपीला ताब्यात घेतले आहे

ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे नाशिकरोड रेल्वे स्थानकावर जोरदार स्वागत

* इतर खासदार पक्ष सोडून गेले तरी वाजे मात्र ठाकरेंसोबत कायम असल्याने ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत

* ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी देत राजाभाऊ वाजे यांचे स्वागत

मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

बेस्ट कर्मचाऱ्यांनी आज संपाची घोषणा केली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर रिक्षां चालकांनी प्रवाशांची लूट चालवली आहे. शेअर रिक्षा चालकांनी अचानक भाडे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सातपुड्यातील पहिल्या साकव पुलाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते लोकार्पण

अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम डाबचा राऊतपाडा गावात सातपुडा भागातील पहिल्या साकव पुलाचे लोकार्पण आमदार आमश्या पाडवी आणि जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. हा जिल्ह्यातील अशा प्रकारचा पहिलाच पूल ठरला आहे.

पावसाळ्यात येथील स्थानिक नदीला पूर आल्यावर आदिवासी बांधवांचा जवळच्या गावांनी संपर्क तुटायचा. ग्रामस्थांना आणि शाळकरी मुलांना जीवघेणा प्रवास करत नदी ओलांडावी लागत असे. या समस्येची दखल घेत आमदार पाडवी यांच्या पाठपुराव्यातून हा पूल उभारण्यात आला आहे.

या साकव पुलामुळे सातपुड्यातील दुर्गम भागातील आदिवासी बांधवांचा पावसाळ्यातील धोकादायक प्रवास थांबणार असून, त्यांचा दळणवळणाचा प्रश्न कायमचा मिटला आहे.

खेड तालुक्यात थरारक दुहेरी मृत्यू; पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेलूगाव ठाकरवस्ती येथे धक्कादायक घटना उघडकीस आली. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असून परिसरात खळबळ उडाली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर

अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्या करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन चार तास बंद राहणार

उद्या सकाळी आठ ते दुपारी साडेबारा या वेळेत देवीचे दर्शन बंद राहणार

अमित शहा मंदिरातील विकास आराखड्यांतर्गत प्रदक्षिणामार्ग आणि राम मंदिर जतन व संवर्धनाच्या कामाचा घेणारा आढावा

या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडक व्यवस्था

सुरक्षेच्या कारणास्तव देवीचे दर्शन भाविकांसाठी राहणार बंद

राज्य सरकारने 'माहितीचा अधिकार नियम २०२६' अधिसूचित करत महत्त्वाचे बदल

- आरटीआय कार्यकर्त्यांचा नियमांना विरोध, तर कर्मचारी संघटनांचे स्वागत

- माहिती अधिकारासाठी पहिल्या अर्जाचे शुल्क आता ३० रुपये, प्रथम अपील शुल्क ५० रुपये, तर द्वितीय अपीलसाठी १०० रुपये आकारले जाणार

- कागदपत्रांच्या प्रत्येक प्रतीसाठी आता ५ रुपये शुल्क

- अभिलेख पाहणीदरम्यान केवळ पेन्सिल वापरण्याचा नियम लागू

- माहितीचा अधिकार हा लोकशाहीतील मूलभूत अधिकार असल्याचे आरटीआय कार्यकर्त्यांचे मत

- शुल्कवाढ आणि शब्दमर्यादेमुळे सामान्य नागरिकांच्या माहितीच्या अधिकारावर मर्यादा येण्याची भीती

- केवळ सार्वजनिक हिताशी संबंधित माहितीच उपलब्ध करून देण्यावर भर

- नागरिकांच्या गोपनीयतेचे संरक्षण होणार, असा कर्मचारी संघटनांचा दावा

- उद्धव ठाकरेंची साथ न सोडल्यामुळे खासदार राजाभाऊ वाजे यांचं ठाकरेंच्या शिवसेनेकडून थोड्याच वेळात ढोलताशाच्या गजरात वाजत गाजत नाशिकरोड रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.