देशभरात 'मोगली गर्ल' म्हणून ओळख मिळालेल्या एहसास हिचं वयाच्या १८ व्या वर्षी निधन झालं आहे. उत्तर प्रदेशातील लखनौ येथील डॉ. राम मनोहर लोहिया वैद्यकीय विज्ञान संस्थेत १५ जून रोजी तिने अखेरचा श्वास घेतला. शवविच्छेदन अहवालानुसार, फुफ्फुसाच्या आजारामुळे तिचा मृत्यू झाला.
जानेवारी २०१७ मध्ये उत्तर प्रदेशातील बहराईच जिल्ह्यातील वन्यजीव अभयारण्याच्या मोतीपूर परिसरात ही मुलगी एकटी भटकताना आढळून आली होती. त्यावेळी तिचा मानवी समाजाशी फारसा संपर्क नव्हता. ती दोन हात आणि दोन पायांच्या भरवश्यावर चालत होती, लोकांपासून दूर राहायची, कपडे घालण्यास नकार द्यायची आणि ओरडून किंवा हातवाऱ्यांमधून संवाद साधायची. त्यामुळे तिची तुलना रुडयार्ड किपलिंग यांच्या 'मोगली' या काल्पनिक पात्राशी केली होती.
Chunar Fort: 'चंद्रकांता'च्या अद्भुत जगाची खरी प्रेरणा! ५२ खांबांचा सोनवा मंडप अन् २०० फूट खोल विहिरीचे चक्रावून टाकणारे रहस्यबालकल्याण समितीने सुरुवातीला तिला 'पूजा' हे नाव दिले होतं. नंतर तिचे नाव 'एहसास' ठेवण्यात आले होतं. तसेच लखनौतील विशेष बालगृहात तिची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक वर्षांच्या उपचारांनंतर तिच्यात हळूहळू बदल होत गेले. तिने कपडे परिधान करण्यास सुरुवात केली. आपल्या सांभाळ करणाऱ्या व्यक्तींना ओळखत होती. तिची काळजी घेणाऱ्या राणी यांना ती प्रेमाने 'अम्मा' म्हणायची.
Black Magic : भूतबाधेच्या अंधश्रद्धेतून विवाहितेवर अमानुष हल्ला; पाच वर्षांच्या मुलासमोरच कडुलिंबाच्या काठ्यांनी क्रूरपणे मारहाणमात्र, मेंदूची वाढ पूर्णपणे न झाल्याने तिला अडचणी होत्या. तिला वारंवार अपस्माराचे झटकेही येत होते. अनेक आव्हानांवर मात करत जगलेली एहसास अखेर काळाच्या पडद्याआड गेली. तिच्या जाण्याने तिच्यावर प्रेम करणाऱ्यांच्या आठवणी मात्र कायम राहणार आहेत.