दिग्गज अभिनेते देव आनंद यांच्या एका संधीचं सोनं केलं अन् बनला बॉलिवूडचा सुपरस्टार, आज मुलगी करतेय बॉलिवूडवर राज्य, ओळखलं का कोण?
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क June 20, 2026 09:43 AM

Bollywood Actor Shatrughan Sinha Struggle Life: 'इंडियन आयडल' (Indian Idol) या प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शोच्या (Famous Reality Show) आगामी भागात, प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Famous Actor Shatrughan Sinha) येणार आहेत. या एपिसोडमध्ये त्यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील काही मनाला चटका लावून जाणाऱ्या आठवणींना उजाळा देताना दिसले. दिग्गज दिवंगत अभिनेते देव आनंद (Legendary Late Actor Dev Anand) यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी  सिनेसृष्टीत पाऊल ठेवल्याचंही त्यांनी सांगितलं. शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी सांगितलं की, त्यांचा सिनेसृष्टीतला प्रवास खऱ्या अर्थानं देव आनंद यांच्यामुळेच सुरू झाला. ते म्हणाले की, "सिनेसृष्टीतील माझ्या आयुष्याची सुरुवात देव साहेबांमुळे झाली. त्यांनी मला केवळ संधीच दिली नाही, तर त्यांचे आशीर्वादही दिलेत. त्यांनी मला त्यांच्या 'प्रेम पुजारी' सिनेमात भूमिका दिली. ती भूमिका जरी लहान असली, तरी त्यामुळे मला ओळख मिळाली आणि प्रेक्षकांकडून खूप प्रशंसाही मिळाली..."

पाकिस्तानी व्यक्तिरेखा साकारायची होती अन्... (Dev Anand Gave Chance To Shatrughan Sinha)

शत्रुघ्न सिन्हा यांनी नमूद केलं की, या सिनेमात त्यांना एका पाकिस्तानी व्यक्तीची भूमिका साकारायची होती. त्यांनी आठवण सांगताना म्हटलं की, "या सिनेमात 'फूलों के रंग से, दिल की कलम से' हे प्रसिद्ध गाणं होतं. जेव्हा मी शुटिंगसाठी गेलो आणि माझे डायलॉग्स म्हटले, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तो क्षण माझ्यासाठी अत्यंत खास होता..."

शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले की, "देव साहेब माझ्याकडे आले आणि त्यांनी दिग्दर्शकाला, तसेच मलाही सांगितलं की, एखाद्या व्यक्तीकडून प्रेरणा घेणं, त्यांच्याकडून उत्साह आणि ऊर्जा मिळवणं, त्यांच्याकडून शिकणं ही चांगली गोष्ट असली, तरीही कधीही कोणाची नक्कल करू नये... त्यांनी मला नेहमीच माझं स्वतःचं वेगळेपण आणि ओळख जपण्याचा सल्ला दिलाय..."

देव आनंद यांनी वाजवल्या टाळ्या (Legendary Late Actor Dev Anand)

देव आनंद म्हणाले की, देव आनंद यांचे ते शब्द त्यांच्या हृदयात कायमचे कोरले गेले. त्यानंतर, त्यांनी आणखी एका सीनचं शुटिंग केलं ज्यामध्ये त्यांना एक मोठा डायलॉग म्हणायचा होता. शत्रुघ्न सिन्हा आठवण सांगताना म्हणाले, "जेव्हा मी तो शॉट पूर्ण केला, तेव्हा खुद्द देव आनंद यांनीच सर्वात जोरदार टाळ्या वाजवल्या. ते कॅमेऱ्यासमोर आले आणि त्यांनी मनापासून माझं कौतुक आणि प्रोत्साहन केलंय, त्या दिवशी ते अत्यंत आनंदी होते..."

शत्रुघ्न सिन्हा यांनी हे देखील सांगितलं की, त्यांनी नंतर देव आनंद यांच्यासोबत 'गॅम्बलर' (Gambler) सिनेमात काम केलं, जिथे त्यांना पुन्हा एकदा एक छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. देव आनंद यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्यावरील विश्वास हीच आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी नमूद केलं.

शत्रुघ्न सिन्हा यांच्याबाबत थोडंसं... (Actor Dev Anand Shatrughan Sinha)

शत्रुघ्न सिन्हा म्हणजे, बॉलिवूड सुपरस्टार. ज्यांनी 'कालीचरण', 'नसीब', 'काला पत्थर', 'दोस्त' आणि 'जानी दुश्मन' यांसारख्या फिल्म्समध्ये काम केलंय. तसेच, 70 ते 80 च्या दशकात ते बॉलिवूडच्या प्रसिद्ध सुपरस्टार्सच्या यादीत सहभागी झाले. त्यांच्या 'खामोश...' डायलॉग आजही चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. सुपरस्टार शत्रुघ्न सिन्हा यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची लेक सोनाक्षी सिन्हासुद्धा बॉलिवूडमध्ये आली. आज तिचा समावेश लेडी सुपरस्टार अभिनेत्रींच्या यादीत होतोय. 

Ramayana Clash With Jailer 2: 4000 कोटींच्या 'रामायण'ची 'थलाइवा'शी टक्कर? दिवाळी 2026 ला बॉक्स ऑफिसवर 'महाक्लॅश', चाहत्यांची उत्सुकता शिगेला, तर निर्मात्यांना घाम फुटला

ABP Majha च्या बातम्या LIVE

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.