जुने नाशिक: 'सकाळ'मध्ये दुधात भेसळीवर प्रकाशझोत टाकल्यानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी थेट रस्त्यावर उतरून दूध भेसळीची तपासणी केली. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास विभागाच्या अधिकाऱ्यांसह शहरातील जुने नाशिक येथील दूध बाजारात धडक देत व्यावसायिकांकडील दुधाची तपासणी केली. सर्व तपासणी निगेटिव्ह आल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली.
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अचानक शुक्रवारी (ता. १९) सकाळी दूध बाजारास भेट दिली. दूध विक्रेता व्यावसायिकांशी चर्चा केली. या वेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह त्यांनी स्वतः दुधाचे नमुने घेत दुधात भेसळ आहे किंवा नाही, याची तपासणी केली, जागेवर नऊ प्रकारच्या तपासण्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या. त्यात कुठल्याही व्यावसायिकाच्या दुधात भेसळ असल्याचे आढळून आले नाही.
Satara: खटावला आफ्रिकन चातकाचे आगमन; पडळची ‘ई-बर्ड’ संकेतस्थळावर नोंद; शेतकऱ्यांना पावसाची अपेक्षासध्या तरी भेसळमुक्त दूध असल्याचे समोर आल्याची माहिती झिरवाळ यांनी दिली. तसेच उलट तपासणी म्हणून काल दुधाचा किती साठा विक्रीसाठी होता, आज किती साठा आहे, दोन्ही दिवसात चार हजार लिटर दूध एकसमान साठा आल्याची माहिती विक्रेत्यांनी दिल्याने त्यातूनही भेसळ झाली नसल्याचे निदर्शनात आले. यापूर्वी कारवाई होत होती. परंतु ती मुंबई आणि अहिल्यानगर भागतच होत होती. नाशिक शहरातही अशा प्रकारची कारवाई व्हावी. मीदेखील नाशिककर आहे. या अनुषंगाने तपासणी करण्यात आल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
यापुढेही IMPACT तपासणी अशाच प्रकारची कारवाई सुरू राहणार असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, अशोकस्तंभ येथील एका मेडिकलचीदेखील केल्याची माहिती समोर आली आहे. तपासणी अथवा कारवाई करण्यासाठी थेट मंत्री रस्त्यावर उतरून तपासणी केल्याने दूध खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमध्येही चर्चेचा विषय ठरला.