Maharashtra News Live Update: वायुसेनेच्या माध्यमातून नीट परिक्षेच्या प्रश्न पत्रिका नागपूरात पोहचल्या
Saam TV June 20, 2026 11:45 PM
वायुसेनेच्या माध्यमातून नीट परिक्षेच्या प्रश्न पत्रिका नागपूरात पोहचल्या

- द्या रविवारी होणाऱ्या NEET - UG परिक्षेसाठी नागपूरच्या विविध परिक्षा केंद्रांवर सीआरपीएफ आणि सीआरपीएफ ने सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे.

- वायुसेनेच्या माध्यमातून नीट परिक्षेच्या प्रश्न पत्रिका नागपूरात पोहचल्या आहेत. या प्रश्नपत्रिका परिक्षा केंद्रांवर सीआरपीएफच्या वतीने रविवारी हस्तांतरित केल्या जातील.

- परिक्षा केंद्रावर आता बैठक व्यवस्था पुर्ण करण्यात आली आहे.

- नागपूरच्या पीएम श्री केंद्रीय विद्यालय वायुसेना नगर या परिक्षा केंद्र

राज ठाकरे आणि मराठी माणसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट,डोंबिवलीत मनसे आक्रमक, तरुणावर कारवाई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मराठी माणसांबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या आरोपावरून डोंबिवलीत वातावरण तापले आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात कठोर फौजदारी कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात साखर उद्योगासाठी ३ हजार कोटींचे प्रकल्प - अमित शहा

महाराष्ट्रातील सहकारी साखर उद्योगाला नवी ताकद देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोठी घोषणा केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात इथेनॉल, सीबीजी आणि इतर उपउत्पादन निर्मितीसाठी १५०० कोटी रुपयांचा प्रकल्प, तर पुण्यात या उद्योगांसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्री निर्मितीसाठी आणखी १५०० कोटी रुपयांचा प्रकल्प उभारला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. इचलकरंजी येथे झालेल्या भाजपा-महायुतीच्या विराट सभेत ते बोलत होते.

चंद्रपुरात वायू प्रदूषणाचा कहर; साडेतीन वर्षांत 325 जणांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या वायू प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, मागील साडेतीन वर्षांत तब्बल 325 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्याच्या वैद्यकीय अहवालातून हा खुलासा झाला आहे. 2024 मध्ये सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली असून 31 हजारांहून अधिक नागरिक विविध आजारांनी त्रस्त आहेत. वीज केंद्रे, कोळसा खाणी आणि कोळशाच्या वाहतुकीमुळे प्रदूषण वाढत असल्याचा आरोप होत असून, प्रदूषण नियंत्रणासाठी तातडीने कठोर उपाययोजनांची मागणी होत आहे.

यशवाडी हनुमान मंदिर परिसरातील बचाव कार्य पूर्ण

यशवाडी हनुमान मंदिर परिसरातील बचाव कार्य पूर्ण

सर्व ३२ जणांना बाहेर काढण्यात आले

३२ पैकी ७ जणांचा मृत्यू २५ जण गंभीर जखमी

जिल्हाधिकारी संजय चव्हाण,उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण तहसीलदार पांडुरंग माचेवाड

बचाव कार्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अग्निशमन विभाग पाथरी मानवत सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा आरोग्य अधिकारी वैद्यकीय पथक महापालिका परभणी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने करण्यात आले

मनमाड-निफाड परिसरात पावसाची दमदार हजेरी; उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मनमाड आणि निफाड परिसरात शनिवारी संध्याकाळच्या सुमारास अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची काही काळ तारांबळ उडाली. मात्र गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, शेतकरी वर्गातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पावसाचा हा जोर कायम राहिल्यास शेती मशागतीच्या कामांना वेग येईल आणि पेरण्यांनाही सुरुवात होईल, असा आशावाद बळीराजाकडून व्यक्त केला जात आहे.

मावळच्या आंबी एमआयडीसी मधील पुष्पक अॅग्रो कंपनीला आग

मावळच्या आंबी एमआयडीसी परिसरातील वराळे येथील पुष्पक अॅग्रो कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. शेतकऱ्यांसाठी कीटकनाशके आणि शेतीसाठी आवश्यक उत्पादने तयार करणाऱ्या या कंपनीत अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

नीट पेपरफुटीनंतर सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ

चंद्रपूर जिल्ह्यात 10 केंद्रांवर उद्या नीट परीक्षा होणार आहे. एकूण 3301 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. मागच्या पेपरफुटीनंतर सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. चंद्रपुरात प्रश्नपत्रिका वायुदलाच्या विमानाने आधीच पोचल्या असून त्या जिल्हा प्रशासनाने काटेकोर सुरक्षा बंदोबस्तात गोपनीय ठिकाणी ठेवल्या आहेत. उद्या प्रश्नपत्रिकांची वाहतूक आणि प्रत्यक्ष केंद्रावर असणारी सुरक्षा याबाबत पोलीस प्रशासनाने आज चाचपणी केली. चंद्रपुरात सुमारे 300 पोलिस कर्मचारी- अधिकारी यादरम्यान तैनात असतील. प्रत्येक केंद्रावर CISF जवानांचा बंदोबस्त असणार आहे. प्रत्येक केंद्रावर जिल्हा प्रशासनाने वेगळी यंत्रणा उभारली आहे.

रायगडमध्ये पावसाची हजेरी

रायगडमध्ये पावसाची हजेरी

दुपारी उत्तर रायगड तर संध्याकाळी दक्षिण रायगडमध्ये पावसाने लावली हजेरी

गर्मीने हैराण झालेल्या रायगडकरांना पावसाच्या हजेरीने मिळाला दिलासा

मध्यम जोराच्या वाऱ्यांसह पावसाने लावली रायगडमध्ये हजेरी

उद्धव ठाकरेंचा फुटलेल्या खासदारांच्या मतदार संघात दौरा

उद्धव ठाकरेंचा फुटलेल्या खासदारांच्या मतदार संघात दौरा

माहिती अधिकार कायद्यात बदल झाले नाही तर उपोषणाला बसू - अण्णा हजारे

माहिती अधिकार कायद्यात झालेल्या बदलात दुरुस्ती करावी अन्यथा उपोषण करण्याचा इशारा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. अण्णांनी सांगितलं की शुल्क वाढविणे हा फार मोठा दोष आहे. शुल्क वाढवून तुम्ही पैशे कमवायला बसले का असा सवाल उपस्थित करत सरकारने जनतेचे हित पहिले पाहिजे मात्र तुम्ही पैसा कमवायला लागला आणि पैसा जर डोळ्यासमोर ठेवायला लागलं तर बरोबर नाही त्यामुळे याबाबत जर बदल नाही केला तर मुख्यमंत्री यांना पत्र नाही तर त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करू उपोषणाला बसू असा इशारा अण्णा हजारेंनी दिला आहे.

खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी धर्मराव बाबा आत्माराम यांचा घेतला खरपूस समाचार

स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात अन्नातून विषबाधा झालेल्या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी आज दुपारी शरद पवार गटाचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे आले होते.यावेळी धर्मराव बाबा आत्माराम यांनी शरद पवार गट पक्ष फुटीवर भाष्य करताना शरद पवार गटाचे 8 खासदार अजित पवार गटात जाणार असल्याचे वक्तव्य केले होते.त्यावर बोलताना खा.सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांनी धर्मराव बाबा आत्माराम यांनी केलेल्या विधानाचा खरपूस समाचार घेतला.

beed : बीडच्या बऱ्हाणपूर येथे शेतकरी हक्क मोर्चाकडून फसव्या कर्जमाफी जीआरची होळी

सरकारला खासदार फोडायला पैसे आहेत, मात्र शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करायला पैसे नाहीत? सरकार ऑपरेशन टायगर, ऑपरेशन NCP, ऑपरेशन TMC राबवत आहे. सरकारने ऑपरेशन सरसकट कर्जमाफी राबवावे, अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाने केली. तसेच जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही, तोपर्यंत आम्ही जीआरची होळी करणार, असा इशारा मोर्चाने दिली.

nagpur : नागपुरातील विद्यार्थ्याला बदलून मिळाले Neet फेरपरीक्षेचे केंद्र

नागपूरच्या अब्दुलाला Neet फेरपरीक्षेचे केंद्र अखेर बदलवून मिळाले..

नागपुरातील अजनी येथील पीएम श्री केंद्रीय विद्यालयात असणार पेपर

अगोदर फेर परीक्षेसाठी अबुधाबी येथील परीक्षा केंद्र देण्यात आले होते.

यात साम टीव्हीने बातमी दाखवली होती...त्यानंतर अब्दुलाला दिलासा मिळाला..

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे : अण्णा हजारे 

पवनराजे निंबाळकर खटल्यातील सर्व नऊ जणांना उच्च न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केला आहे. यावर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालय न्यायालयाने दिलेला निर्णय सगळ्यांनी मान्य करायला हवा आणि जो निर्णय न्यायालयाने दिला आहे तो आपण मान्य केला पाहिजे, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे

एकही खासदार कुठंही जाणार नाही, शिंदेगटाच्या नेत्याच्या दावा

एकही खासदार कुठंही जाणार नाही..

राजकारणात कमिटमेन्ट महत्त्वाची असते…

सहा खासदार आमच्यासोबत उद्या या संदर्भात पूर्ण पणे माहिती समोर येणार…

पवनराजे हत्या प्रकरणाच्या निकालानंतर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याची प्रतिक्रिया…

सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच निर्णय जाहीर केला जाणार…

शिंदे गटाच्या उच्च पदस्थ नेत्यांची माहिती

परळीत दिवसाढवळ्या अपहरण ऊसतोडणीच्या'उचल' पैशांवरून तरुणाला गाडीत टाकून पळवले 

बिडच्यां परळी शहरात भरदिवसा एका तरुणाचे चारचाकी गाडीतून अपहरण करण्यात आल्याची थरारक घटना समोर आली आहे. ऊसतोडणीच्या कामासाठी घेतलेल्या उचल पैशांच्या वादातून हा गंभीर प्रकार घडला असून, परळी शहर पोलिसांनी २४ तासांच्या आत धडक कारवाई करत ६ पैकी ३ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

आळंदीत कोयत्याचा धाक; तरुणाची घरात घुसून दादागिरी, व्हिडिओ व्हायरल 

आळंदीत प्रेमाच्या नावाखाली धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने मुलीच्या घरात घुसून कुटुंबीयांना कोयत्याचा धाक दाखवत धमकावल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक दिनी शिवप्रेमींचे अक्षेपार्य व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी

6 जुन रोजी किल्ले रायगडावर साजरा झालेल्या शिवराज्याभिषेक दिनी पहाटे प्रातःविधीसाठी गेलेल्या शिवप्रेमींचे ड्रोनद्वारे व्हिडीओ चित्रीकरण करुन ते समज माध्यमांवर व्हायरल करण्यात आल्याची किळसवाणी घटना समोर आली आहे.

अवैध गावठी दारू अड्डे उद्धवस्त, येवला तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई 

पुणे जिल्ह्यात गावठी दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलीस प्रशासनाने राज्यभरात हातभट्टी द्वारे बनवल्या जाणाऱ्या गावठी दारू विरोधात मोहीम उघडली असून नाशिकच्या येवला तालुका पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या द्वारे राजापूर-ममदापूर वन्यजीव संवर्धन क्षेत्रालगत आज्ञास्थळी मारलेल्या छाप्यामध्ये गावठी दारू बनवण्याचा अड्डा पोलिसांनी उध्वस्त केला आहे.

जिल्ह्यावरील पाणीटंचाईचे संकट गडद

जून महिना सुरू होऊन वीस दिवस उलटले.पावसाने फिरवली पाठ.

जिल्ह्यावरील पाणीटंचाईचे संकट गडद.

नांदेडकरांची तहान भागवणाऱ्या विष्णुपुरी धरणात केवळ 38 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक

बंडखोर ओमराजे सध्या कोर्टात हजर 

बंडखोर ओमराजे सध्या कोर्टात हजर झाले आहेत.

बंडखोर ओमराजे सध्या कोर्टात हजरआम्हाला गॅस नको, आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे नको. आमच्या शेतमालाला भाव द्या,संपूर्ण कर्जमाफी करा- महिला शेतकरी

आम्हाला गॅस नको, आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे नको. आमच्या शेतमालाला भाव द्या,संपूर्ण कर्जमाफी करा.

अन्यथा आम्हाला आत्महत्या शिवाय पर्याय उरला नाही. महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर.

आमची फडणवीसांनी धुळधान केली.सारा महाराष्ट्र त्यांनी नासवला.त्याची देखील धुळधान होईल महिला शेतकऱ्याची संतप्त प्रतिक्रिया.

नव्या गळतीसाठी अभिनंदन! जयंतराव पाटील यांचा खोचक टोला

१९ हजार कोटी रुपये खर्चून सहा महिन्यांपूर्वी कार्यान्वित झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पावसाळ्यापूर्वीच गळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावरून 'नव्या गळतीसाठी अभिनंदन!' असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी सरकारला खोचक टोला लगावला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतूकदार संघटना आक्रमक

नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतूकदार संघटना आक्रमक...

आजपासून वाहतूक पूर्णपणे बंद करत पुकारला संप...

​नंदुरबार शहरातील सीबी पेट्रोल पंप शेजारच्या मैदानावर 150 ते 200 डंपर आणि ट्रक उभे करून वाहतूकदारांचे ठिय्या आंदोलन सुरू....

गुजरात राज्यातून रीतसर रॉयल्टी भरून आणल्या जाणाऱ्या वाळूवर महसूल प्रशासनाकडून होत असलेल्या दंडात्मक कारवाईविरोधात तीव्र संताप....

महाराष्ट्रात वाळू झोन उपलब्ध नसताना, गुजरातची वैध रॉयल्टी असतानाही नंदुरबार महसूल प्रशासन गाड्या पकडून करतंय लाखो रुपयांची दंडात्मक कारवाई...

गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेले संभाजीनगरचे 5 जण समुद्रात बुडाले

8 जण समुद्रात उतरले होते त्यापैकी 5 जण बुडाले तर 3 जणांना वाचवण्यात यश, शोधकार्य सुरू

समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले

आज सकाळी 10 च्या सुमारासची घटना

पाचही जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

नंदुरबार जिल्ह्यात दारू तस्करीवर आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

हरियाणातून महाराष्ट्र मार्गे गुजरात राज्यात जाणारा विदेशी दारूचा कंटेनर शहादा पोलिसांनी पकडला...

नंदुरबारमधील प्रकाशा नजीक शहादा पोलिसांना मिळाली गुप्त माहिती सापळा रचून पकडली दारू...

​शहादा पोलिसांच्या धडक कारवाईत तब्बल 90 लाख रुपयांचा विदेशी दारू साठा जप्त...

या विदेशी दारूवर छापील किंमत नसून फक्त हरियाणा राज्यापूर्ती मर्यादित असल्याचं समोर आला आहे...

या कार्यवाहीत तब्बल 800 ते 900 विदेशी दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले....

अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

परभणी शहरातील विविध भागात ATS पथकांची धाड

छत्रपती संभाजी नगर येथील ATS पथकांच्या १५ टीम कडून विविध भागात धाडी

शहरातील धार रोड,गुजरी बाजार, अपना कॉर्नर परिसरातील भागात धाडी

एक संगणकाचे दुकान, एक होजियारी च्या दुकानासह काही घरांवर धाडी

मागच्या काही दिवसापासून ATS कडून या भागातील काही लोकांवर लक्ष होते

नेमकी कारवाई कुठल्या अनुषंगाने होतेय हे मात्र अद्याप कळले नाही

बाहेरच्या जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्त घेवून परभणीत धाडी

डी.आर.डी.ओचे डॉ प्रदीप कुरुलकरवर आरोप निश्चित, खटल्याच्या सुनावणीचा मार्ग अखेर मोकळा

डी आर डी ओ माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याच्याविरोधात अखेर सरकारी गुपिते न अधिनियमांतर्गत आरोप निश्चिती करण्यात आली.त्यामुळे पुण्यासह देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या या कथित 'हनी ट्रॅप' प्रकरणात तीन न वर्षांनंतर सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

पंढरपूरच्या तांदुळवाडी दुर्घटनेतील कुटुंबियांना 40 लाखांची मदत

सोलापूर जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे विहीरीत टेम्पो कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 40 चाळीस लाख रूपयांची मदत देण्यात आली. आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते कुटुंबियांना मदतीचा धनादेश देण्यात आला. या अपघातामध्ये बावचे आणि सातोरे कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली होती.

छत्रपती संभाजीनगरात सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेला परिसरातील पुंडलिकनगर येथील महारुद्र हनुमान मंदिराजवळ आज पहाटे दोन मजली बिल्डिंगमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेत संपूर्ण घर जळून खाक झाले. पुंडलिकनगर येथील महारुद्र हनुमान मंदिराजवळ रस्त्यावरच दुमजली इमारत असून, या इमारतीत खाली दुकाने व वरती निवासी घरे आहेत.

मान्सूनच्या विलंबामुळे मराठवाड्यात खरीप पेरण्या रखडल्या; शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

मराठवाड्यात मान्सूनच्या आगमनाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. जूनचा तिसरा आठवडा सुरू झाला असला तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या असून शेतकरी चिंतेत आहेत. सोयाबीन, कापूस, मका आणि तूर यांसारख्या पिकांच्या पेरणीसाठी आवश्यक ओलावा जमिनीत उपलब्ध नसल्याने अनेक शेतांमध्ये मशागतीची कामे पूर्ण होऊनही बियाणे पेरले गेलेले नाही.

तुम्ही ज्या आमदारकीचा आनंद घेताय ती आम्ही सोडून दिलेली पदं आहेत : सुजय विखे यांचा विवेक कोल्हेंवर निशाणा

आमदार व्हायचं असतं तर मागच्या दोन महिन्यात झालो असतो.. नवीन पोरांना सांगतो, पदाचा आनंद मर्यादित ठेवा.. तुम्ही ज्या पदाचा आनंद घेताय ती आम्ही सोडून दिलेली पदं आहेत.. आम्हाला सत्कारासाठी पदांची गरज नाही, अशा शब्दात सुजय विखे यांनी नाव न घेता भाजपचेच विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार विवेक यांच्यावर निशाणा साधलाय..

- आजपासून नाशिक शहरात पाणी कपात लागू

- संपूर्ण शहरात आज पाणीपुरवठा राहणार बंद तर उद्या कमी दाबाने होणार पाणीपुरवठा

- मान्सून लांबल्याने शहरात एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय

- 31 ऑगस्टपर्यंत पाणीसाठा पुरवण्याच प्रशासनासमोर आव्हान

- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, मुकणे आणि दारणा धरणांतील पाणीसाठा घटल्याने महापालिकेचा पाणी कपातीचा निर्णय

- शहरातील विहिरी आटल्याने खासगी टँकरची मागणी वाढली

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी अमित शहांच्या दौऱ्या दरम्यान काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष एडवोकेट माणिक शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन केलं स्थानबद्ध

Maharashtra News Live Update: पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल

२००६ मध्ये राज्यभर गाजलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल आज मुंबईतील न्यायालयात जाहीर होण्याची शक्यता आहे.तब्बल वीस वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यातील अंतिम निर्णयाकडे धाराशिव सह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्यात पाणीटंचाईचा धोका; मोठ्या धरणांत केवळ 30 टक्के पाणीसाठा

यवतमाळ जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद होताना दिसत आहे. जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले असून मध्यम प्रकल्पांनीही तळ गाठला आहे तर मोठ्या धरणांमध्ये केवळ 30 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता 31 ऑगस्टपर्यंत धरणातील पाणी न सोडण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.