मुंबई: देशभरात पेपरफुटीनंतर होत असलेल्या नीट यूजी 2026 च्या (NEET) परीक्षेसाठी आज देशभरात एनटीएनने मोठी तयारी केल्याचं दिसून आलं. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वच परीक्षा केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लागलो होता. लातूर पॅटर्नमुळे देशभरात गाजलेल्या लातूर (Latur) जिल्हा प्रशासनानेही नीट परीक्षेची सर्व तयारी केली होती. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर, एनटीएकडून देण्यात आलेल्या नियमांचेही काटेकोरपणे पालन करण्यात येत होते. एनटीएच्या याच नियमांचा फटका दोन विद्यार्थ्यांना बसला असून केवळ दोन मिनिटे उशीर झाल्याने मुंबईतील (MUmbai) दोन विद्यार्थ्यांना परत फिरावे लागले.
मुंबईतील परळ भागातील महर्षी दयानंद कॉलेज हे यंदाच्या पुनर्परिक्षा घेण्यात येत असलेल्या NEET पेपरचे केंद्र आहे. या ठिकाणी दोन विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी अवघे दोन मिनिटे उशीर झाल्याने त्यांचे अक्षरश: वर्ष वाया गेलं आहे. परीक्षा केंद्रावर केवळ 2 मिनेट उशिरा पोहचल्याने दोन विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही, त्यामुळे परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ झाला. यावेळी, परीक्षार्थी उमेदवारांची घालमेल पाहून इतर विद्यार्थांच्या पालकांनी देखील संबंधित दोन विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आता घ्यावे म्हणून प्रशासनाकडे विनंती केली. मात्र, NTA अधिकाऱ्यांनी नियमांच्या पुढे जात येत नाही, असे म्हणत दोन्ही विद्यार्थ्यांना प्रवेशास मनाई केली. त्यामुळे, या दोन्ही विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते.
गेल्या वर्षीच्या नीट पेपरफुटी प्रकरणानंतर यंदा परीक्षा प्रक्रियेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि लातूर या संवेदनशील परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश दिल्यानंतर प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ केली आहे. लातूर जिल्ह्यातील 26 परीक्षा केंद्रांवर एकूण 14 हजार 687 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून आरोग्य पथके, ड्युटी मॅजिस्ट्रेट तसेच स्टेट ऑब्झर्व्हर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये तसेच परीक्षा शांततापूर्ण वातावरणात पार पडावी, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय... अल्पोपहार फळे आणि ज्यूस. तसेच, वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यात आल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनाने दिली.
नीट पेपर फुटीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तीन मे रोजी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आता ही परीक्षा आज दुपारी 2 ते 5.15 या वेळेत यवतमाळ शहरातील एकूण 13 केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे, शहरातील 2 हजार 847 विद्यार्थ्यांचे भविष्य ही नीट परीक्षा ठरविणार आहे. नीट युजी फेरपरीक्षा दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी यंत्रणा अलर्ट मोडवर दिसून आली. प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तर पथकाकडून विद्यार्थ्यांची सुरक्षा तपासणी करण्यात आली.
आला रे आला... पुण्यातही मुसळधार, कोकणात पावसाची संततधार; साताऱ्यातही बसरला, बळीराजाला दिलासा