संतापजनक! अल्पवयीन मुलीवर तिच्याच घरात दोघांनी केला अत्याचार, नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी, कल्याण हादरलं
सुरेश काटे June 21, 2026 08:43 PM

Kalyan Crime News :  कल्याण पूर्वेतून एक अत्यंत धक्कादायक आणि चीड आणणारी घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच घरात दोघांनी अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. कल्याणच्या कोळशेवाडी पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत दोन्ही नराधमांना पीडितेच्या घरातूनच रंगेहात ताब्यात घेतलं आहे. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात  संताप व्यक्त होत आहे.

आरोपींना पीडित मुलीच्या घरातूनच ताब्यात घेतले

पीडित मुलगी घरात एकटी असताना या दोन नराधमांनी घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, परिसरातील शेजाऱ्यांना या संशयास्पद हालचालींची कुणकुण लागली. शेजाऱ्यांनी वेळ न घालवता तातडीने या घटनेची माहिती कोळशेवाडी पोलिसांना दिली. कोळशेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सलीम शेख ,अख्तर मणियार या आरोपींना पीडित मुलीच्या घरातूनच ताब्यात घेतले. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात पोक्सो आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. कल्याण पूर्वेतील शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड,माया कांबळे  यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात पोलिसांची भेट घेऊन नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे 

सरकारचा आणि पोलिसांचा महिला सुरक्षेवर कोणतेही धोरण नाही देवाभाऊच्या राज्यांमध्ये लाडकी बहिणींच्या नावाने राजकारण करायचे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देऊन त्यांच्या मतांचे राजकारण करायचे मात्र त्यांच्या सुरक्षेबद्दल कोणतेही धोरण नाही. अशा घटना घडल्यावर राजकीय नेते राजकारण करतात अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या. कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करत कल्याण न्यायालयात दाखल केले आहे 

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.