Shraddha Kapoor Eetha: अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या 'ईठा' (Eetha) सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमातील टीझर नुकताच सोशल मीडियात (Social Media) लीक झाला. या सिनेमाचा टीझर थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला होता. तेव्हापासून या सिनेमाची आणि श्रद्धा कपूरची विशेष चर्चा होत आहे. या सिनेमात श्रद्धा कपूरने तमशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर (Vithabai Narayangaonkar) यांची भूमिका साकारली. विठाबाई नारायणगावकर यांनी आपल्या कारकिर्दीत बरेच चढ उतार पाहिले आहेत. त्यांच्या आयुष्यातील जीवनपट या सिनेमातून दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे श्रद्धा कपूरने या सिनेमात विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका उत्तमरित्या वठवली आहे.
बॉलिवूड सेलिब्रिटींनी श्रद्धा कपूरचं विशेष कौतुक केलं आहे. यासह श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरनेही आपल्या बहिणीचं कौतुक केलं आहे. त्यानं चित्रपटाचा टीझर आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, बहीण श्रद्धा कपूरच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. तसेच 'ईठा' हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता दर्शवली. शुक्रवारी 'कॉकटेल 2' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर 'ईठा' या सिनेमाचा टीझरही मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आला.
'ईठा' या सिनेमाचा टीझर थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर सिद्धांतने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच स्टोरीवर लिहिले की, 'माझी लाडकी, बहीण.. माझ्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रु आहेत'.. असं म्हणत त्यानं आपल्या बहिणीच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. यासह त्यानं आपल्या पोस्टमध्ये श्रद्धा कपूरलाही टॅग केलं आहे. सिद्धांतची स्टोरी सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
'ईठा' या सिनेमाचा टीझर सोशल मीडियात लीक झाला आहे. या सिनेमातून महान लावणी कलाकार विठाबाई नारायणगावकर यांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. श्रद्धा कपूरने या भूमिकेला विशेष न्याय दिला आहे. टीझरमध्ये विठाबाई गरोदर असल्याचं दिसते. गरोदर असूनही त्या रंगमंच सोडत नाहीत. अढळ निष्ठेने ते रंगमंचावर आपली छाप पाडताना दिसतात. या सिनेमाचा टीझर पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
महाराष्ट्रातील लोककलाकार आणि लावणी नृत्यांगना स्व. विठाबाई नारायणगावकर यांचा जन्म तमाशाच्या वातावरणात होतो आणि ते आपल्या कलेसाठी आयुष्य समर्पित करतात. विठाबाई नारायणगावकर यांना आपल्या कारकिर्दीत विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात आलं आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या सिनेमात आणखी किती कलाकार आहेत? हे लवकरच उघड होईल. दरम्यान, हा सिनेमा 28 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या: