PCMC: पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनात मोठे फेरबदल; एकाचवेळी २७२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
Saam TV June 21, 2026 10:45 PM
  • एकाचवेळी २७२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

  • आठ क्षेत्रीय कार्यालयांचे पुनर्रचना करून दहा क्षेत्रीय कार्यालये स्थापन करण्यात आली

  • लिपिक, मुख्य लिपिक, कनिष्ठ अभियंते आणि उपअभियंत्यांचा बदल्यांमध्ये समावेश

पिंपरी-चिंचवड महापालिकेचेआठचे दहा क्षेत्रीय कार्यालय स्थापन करण्यात आले आहेत. यानंतर महापालिका प्रशासनाने मोठे फेरबदल केले आहेत. एकाच वेळी जवळपास २७२ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आलेत. नव्याने स्थापन होणाऱ्या दोन क्षेत्रीय कार्यालयांच्या अंमलबजावणीपूर्वी महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. यामध्ये लिपिक, मुख्य लिपिक, कनिष्ठ अभियंते, उपअभियंते यांचा समावेश आहे.

IAS Transferred: राज्यातील १२ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या,कोणाची कुठे झाली बदली?

महापालिकाआयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार सध्याच्या आठ प्रभाग समित्यांची पुनर्रचना करत १० क्षेत्रीय कार्यालये स्थापन करण्यात आलीत. ही नवी रचना १ जुलैपासून प्रत्यक्षात लागू होणार आहे. त्यानुसार विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना नव्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नियुक्त करण्यात आलेत.

IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची २१ वर्षाच्या नोकरीत २५वी बदली; प्रामाणिक मुंढेंची वारंवार का होतेय बदली?

या निर्णयामुळे क्षेत्रीय कार्यालयांपासून ते तांत्रिक व प्रशासकीय शाखांपर्यंत कामकाजांची नवीन रचना तयार होणार आहे. दरम्यान नव्या रचनेत सर्व क्षेत्रीय कार्यालयांना महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांची नावे देण्यात आले आहेत. त्यामध्ये 'अ' क्षेत्रीय कार्यालय राजगड, 'व'-सिंहगड, 'क' विजयदुर्ग, 'ड' देवगिरी, 'हैं'-शिवनेरी,'फ' तोरणा, 'ग' पुरंदर, 'ह' प्रतापगड, 'ज'-रायगड आणि 'ल' लोहगड अशी नावे दिली आहेत.

नवीन 'ज' म्हणजेच रायगड क्षेत्रीय कार्यालय ताथवडे येथील महापालिकेच्या वाहनतळ भवनात कार्यरत राहणार आहे. तर 'ल' म्हणजेच लोहगड क्षेत्रीय कार्यालय संत तुकारामनगर पोलीस ठाण्यासमोरील म्हाडा इमारतीच्या गाळ्यात सुरू करण्यात येणार आहे. या पुनर्रचनेमुळे क्षेत्रीय स्तरावरील प्रशासन अधिक सक्षम होईल. नागरिकांना सेवा जलद मिळतोल, असा दावा महापालिका प्रशासनाने केलाय.

कोणत्या विभागातून झाल्या बदल्या

महापालिकेच्या नव्या क्षेत्रीय रचनेनुसार एकूण २७२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात ७५ कनिष्ठ अभियंते, ३६ उपअभियंते, १०३ लिपिक आणि ५८ मुख्य लिपिकांचा समावेश आहे. शहर अभियंता मकरंद निकम यांनी २८ फेब्रुवारीला सेवानिवृत्ती घेतली आहे. तेव्हापासून शहर अभियंता हे पद रिक्त आहे. त्या पदाचे कामकाज मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता मनोज सेठिया, सहशहर अभियंता सुनील भागवानी यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं.

सहशहर अभियंता भागवानी यांच्याकडे असेलेले बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कामकाज आता सहशहर अभियंता सेठिया यांच्याकडे सोपवण्यात आलंय. दरम्यान, स्थापत्य विभागाचे उपअभियंता सुदर्शन वहिकर यांची कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती करण्यात आलीय.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.