आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आज 21 जून रोजी 18 व्या सामन्यात टीम इंडियाचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होत आहे.दोन्ही संघ ए ग्रुपमधील आहेत. तसेच टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेचा हा तिसरा सामना आहे. सामन्याचं आयोजन हे मँचेस्टरमध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार हरमनप्रीत कौर हीने फलंदाजीचा निर्णय घेतला. दोन्ही संघांकडून प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करण्यात आले आहेत.
टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेवर वरचढ
टी 20I क्रिकेटमध्ये टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 21 टी 20I सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने या 21 पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेवर 11 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर दक्षिण आफ्रिकेने टीम इंडिया विरुद्ध 10 सामने जिंकले आहेत. तसेच दोन्ही संघांची टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे दोघांपैकी कोणता संघ एकमेकांविरुद्ध वर्ल्ड कप स्पर्धेत पहिला विजय मिळवणार? याची उत्सूकता चाहत्यांना आहे.
दक्षिण आफ्रिका वुमन्स प्लेइंग ईलेव्हन : लॉरा वोल्वार्ड्ट (कॅप्टन), ताझमिन ब्रिट्स, ॲनेरी डेर्कसेन, डेन व्हॅन निकेर्क, मारिझान कॅप, नादिन डी क्लर्क, क्लो ट्रायॉन (विकेटकीपर), सिनालो जाफ्ता, शबनीम इस्माईल, अयाबोंगा खाका आणि नॉनकुलुलेको मलाबा.
वुमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, अरुंधती रेड्डी, श्री चरणी आणि नंदनी शर्मा.
URL : icc t20i womens world cup 2026 indw vs saw team india won toss and elected batting prema rawat debut see playing 11
TAGS : SAW vs INDW Toss, SAW vs INDW, Icc Womens World Cup 2026, Prema Rawat, Shreyanka Patil, Harmanpreet Kaur, Smriti Mandhana, Kranti Gaud, Arundhati Reddy, Kranti Gaud T20i Debut, Emirates Old Trafford, Manchester,
EXCERPT : South Africa Women vs India Women Toss and Playing 11 : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. नक्की कुणाला संधी मिळालीय? हे जाणून घेऊयात.
PHOTO : SAW vs INDW Toss and Playing 11 (Bcci Women X Account)