ENG vs NZ : तिसरा आणि अंतिम कसोटी सामना, कोण जिंकणार मालिका? गुरुवारपासून थरार
Tv9 Marathi June 25, 2026 06:45 AM

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अंतिम सामना (England vs New Zealand 3rd Test) हा 24 जूनपासून खेळवण्यात येणार आहे. उभयसंघातील ही 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. इंग्लंडने मालिकेत विजयी सलामी देत आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर न्यूझीलंडने करो या मरो स्थितीत दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत पहिल्या पराभवाची परतफेड केली. न्यूझीलंडने दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. त्यामुळे आता अंतिम सामना जिंकून कोणता संघ मालिकेवर नाव कोरण्यात यशस्वी ठरणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड तिसरा कसोटी सामना कधी?

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड तिसरा कसोटी सामना 25 ते 29 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड तिसरा कसोटी सामना कुठे?

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड तिसरा कसोटी सामना नॉटिंगघममधील ट्रेंट ब्रिज इथे आयोजित करण्यात आला आहे.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी साडे 3 वाजता सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड तिसरा कसोटी सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड तिसरा कसोटी सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड तिसरा कसोटी सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड तिसरा कसोटी सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे लाईव्ह पाहता येईल.

दरम्यान या सामन्यातून प्लेइंग ईलेव्हनमध्ये नियमित कर्णधार बेन स्टोक्स आणि गस ॲटकिन्सन या दोघांचं कमबॅक झालं आहे.  इंग्लंडने परंपरेनुसार सामन्याच्या काही तासांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. बेन स्टोक्स आणि गस एटकीन्सन या दोघांचं कमबॅक झाल्याने इंग्लंडची ताकद वाढली आहे. या दोघांना दुसऱ्या सामन्यातून नाईट क्लब प्रकरणी सुरु असलेल्या चौकशीमुळे टीममधून बाहेर ठेवण्यात आलं होतं.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : बेन डकेट, एमिलिओ गे, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), बेन स्टोक्स (कर्णधार), गस ॲटकिन्सन, जोफ्रा आर्चर, जोश टंग, शोएब बशीर.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.