नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला शिक्षा 29 जूनला सुनावली जाणार, 39 मिनिटे चिमुरडीला ओरबाडत राहिला, अंगावर 18 जखमेच्या खुणा, तरी नराधमाच्या चेहऱ्यावर पश्चातापाची रेष सुद्धा नाही
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे June 25, 2026 03:13 PM

Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला दोषी ठरवण्यात आलं आहे. त्याला 29 जून रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. जेव्हा हे प्रकरण उघडकीस आले, तेव्हा संपूर्ण पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रात प्रचंड खळबळ माजली होती. एका चार वर्षांच्या बालिकेसोबत झालेल्या या अमानुष कृत्यामुळे स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. आरोपीला कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नये आणि त्याला थेट फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी आक्रमक मागणी नागरिक, महिला संघटना आणि विविध राजकीय पक्षांनी लावून धरली होती. अवघ्या 14 दिवसात हे प्रकरण न्यायालयासमोर नेत आरोपीला फाशीपर्यंत नेण्यात आलं आहे.

तुला हा संपूर्ण प्रसंग आठवतो का? 

शिक्षा सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी भीमराव कांबळे याला दोषी ठरवल्यानंतर त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यानंतर भीमराव कांबळेला न्यायाधीशांनी विचारले की, 'तुला हा संपूर्ण प्रसंग आठवतो का? आता तूच सांग तुला कोणती शिक्षा द्यायची?', असा सवाल न्यायाधीशांनी विचारला. त्यावर भीमराव कांबळे याने पुन्हा आरोप फेटाळले. तो म्हणाला की, "मी त्या दिवशी त्या मुलीला गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यावेळी मी पाय घसरून पडलो आणि त्याचवेळी त्या मुलीच्या डोक्यालाही मार लागला. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती सारखी ओरडत होती", असे भीमराव कांबळे याने म्हटले. यावर न्यायाधीश भीमराव कांबळेला म्हटले की " आता तू जे सांगतो आहेस तो इतिहास झालाय, कारण तुझ्यावर गुन्हा सिद्ध झालाय. तुला कोणती शिक्षा द्यायला हवी ". न्यायाधीशांच्या या म्हणण्यावर भीमराव कांबळेने कोणतेच उत्तर दिले नाही. त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला खाली बसायला सांगितले.

न्यायाधीश म्हणाले की, ही घटना समाजासाठी घातक आहे. त्या दुर्दैवी मुलीवर झालेले अत्याचार न्यायालयात सिद्ध झालेत. परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदार यांच्या आधारे हा गुन्हा सिद्ध झाला आहे. आरोपीच्या आधीच्या गुन्ह्यांचा इतिहास पाहता तो कोणत्याही परिस्थितीत सुधरू शकत नाही. या आधीच्या दोन गुन्ह्यांमधे हा आरोपी दुर्दैवीरित्या सुटला होता. मात्र तो समाजासाठी घातक आहे. तो सुधारण्याच्या पलिकडे गेला आहे. त्यामुळे फक्त फाशी हीच या आरोपीला योग्य राहील, असे सरकारी वकील म्हणाले. आरोपीच्या वकिलांनी या गुन्ह्यातील घटनांची संगती लगत नसल्याचा युक्तीवाद केला. त्याचबरोबर आऱोपीच्या वकिलांनी तो स्वत या घटनेमुळे धक्क्यात असल्याचा आणि तो 65 वर्षांचा वृद्ध असल्याचा युक्तीवाद केला. तो वृद्ध असल्याने इतका क्रुर गुन्हा करु शकतो का? असाही आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला आणि जन्मठेप योग्य शिक्षा राहील असा दावा केला.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.