Beed Pomegranate Cultivation : ज्या ठिकाणी दगडधोड्यांशिवाय काहीच नव्हते. अशा शेतात तरुण शेतकऱ्याने मोठी कमाल दाखवली. त्याने जिद्दीने आणि कष्टाच्या जोरावर मोठे उत्पन्न घेतलं आहे. बीड जिल्ह्यातील या शेतकऱ्याची शेती पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरली आहे. काही शेतकरी हा प्रयोग पाहण्यासाठी येत आहेत.
आष्टी तालुक्यातील भातोडी येथील तरुण शेतकऱ्याची डाळिंब पिकाची यशस्वी शेती अडीच एकरातून मिळवले 60 लाखांचे उत्पन्न घेतले आहे. ‘भगवा’ जातीच्या डाळिंबाची बाग बहरली असून, यंदा त्यांना तब्बल 60 लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न मिळाले आहे.
जिथे साधे गवतही उगवत नव्हते, अशा दगडधोंड्यांच्या माळरानावर आष्टी तालुक्यातील भातोडी येथील तरुण शेतकरी शंकर गीते यांनी कष्टाने नंदनवन फुलवले आहे. अवघ्या अडीच एकर शेतीत त्यांनी सेंद्रिय पद्धतीने ‘भगवा’ जातीच्या डाळिंबाची बाग बहरली असून, यंदा त्यांना तब्बल 60 लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न मिळाले आहे.
भातोडी येथील तरुण शेतकरी शंकर गीते यांनी ही कमाल करून दाखवली आहे. पारंपारिक शेतीसोबतच त्यांनी गेल्या काही दिवसांपासून अभिनव प्रयोग सुरू केले होते. त्यात त्यांनी माळरानावर डाळिंब शेतीचा निर्णय घेतला. त्यासाठी खूप मेहनत घेतली. शंकर गीते यांच्या डाळिंबाला प्रति किलो 201 रुपयांचा विक्रमी दर मिळाला आहे.
“शेतकरी बांधवांनी शेतीला नोकरीप्रमाणेच गांभीर्याने घ्यावे, माझी शेतीच मला कॉर्पोरेट क्षेत्रापेक्षा मोठे ‘पॅकेज’ देत आहे,” असे सांगत, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन आणि थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी शंकर गीते यांनी राज्य शासनाकडे केली आहे.