Karad Bus Stand Robbery: कऱ्हाड बसस्थानकातील जबरी चोरी उघडकीस; पती-पत्नी अटक
esakal June 27, 2026 12:45 AM

कऱ्हाड ः कऱ्हाड बसस्थानक परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या पती-पत्नीला शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडुन एक लाख पाच हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले. संबंधित संशयीतांनी आणखी तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. श्रावण राजेश कांबळे (वय ३३) व त्याची पत्नी पूनम श्रावण कांबळे (वय २७, दोघे रा. कऱ्हाड) अशी अटक करण्यात आलेल्या पती-पत्नीचे नाव असल्याची महिती पोलिस उपाधिक्षक राजश्री पाटील यांनी आज दिली.

पोलिसांची माहिती अशी ः कऱ्हाड बसस्थानक परिसरातील नवग्रह मंदिर ते एसटी स्थानकादरम्यान चालत जाणाऱ्या महिलेला २२ जुन रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास अडवुन जीवे मारण्याची धमकी देत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्यात आले होते. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळाची पाहणी केली. त्यावरून संशयितांची ओळख पटवून श्रावण कांबळे व त्याची पत्नी पूनम कांबळे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी शहर हद्दीत आणखी तीन गुन्हे केल्याची कबुली दिली. त्या दोघांकडून गुन्ह्यातील एक लाख पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांकडून तीन गुन्ह्यातीसकाळ वृत्तसेवाल उर्वरित मुद्देमालाचा शोध सुरू आहे. पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अतिरीक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलिस उपाधिक्षक राजश्री पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे, गुन्हे प्रमुखचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय गोडसे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखील मगदूम, हवालदार वसीम संदे, सतिश पाटील, संदीप कुंभार, सज्जन जगताप, अनिल स्वामी, धिरज कोरडे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, मोहसीन मोमीन, महेश पवार, निलेश विभुते, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.