Video : 20 लाखांची गाडी पण मनाने भिकारी! डिझेल भरल्यानंतर ड्रायवर पंपावरून पळाला, पेट्रोल भरणारा कासावीस होऊन मागे धावला अन्...
esakal June 28, 2026 10:45 PM

Viral Video : गुरुग्राममध्ये एका पेट्रोल पंपवर चोरट्यांनी नवीन पद्धतीने कट रचला. महिंद्रा स्कॉर्पियोमध्ये आलेल्या तीन जणांनी डिझेल भरून घेतल्यानंतर थेट गाडी दामटली.

सुमारे सहा हजार रुपयांचे डिझेल टाकीमध्ये भरले गेले, पण बिल देण्याऐवजी ड्रायव्हरने अचानक गाडीला वेग दिला आणि पंपवरून पळ काढला. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली असून ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

घटना गुरुग्राममधील एका व्यस्त पेट्रोल पंपवर घडली. दुपारच्या वेळी स्कॉर्पियो गाडी पंपावर आली. गाडीत बसलेल्या तीन तरुणांनी अटेंडंटला डिझेल भरायला सांगितले. अंदाजे ६,००० इतक्या डिझेलची पूर्तता झाल्यावर अटेंडंटने बिल दाखवले.

मात्र त्याच क्षणी ड्रायव्हरने गाडीचा एक्सलेटर दाबला आणि धुरळा उडवत पंपाच्या बाहेर पडला. अटेंडंटने गाडी थांबवण्यासाठी धाव घेतली, पण तो अपयशी ठरला. गाडी वेगाने निघून गेल्याने त्याला काहीच करता आले नाही.

Mobile Restart : मोबाईल कधी रिस्टार्ट करावा अन् कधी नाही? आत्ताच घ्या जाणून नाहीतर फोन होऊ शकतो खराब
View this post on Instagram