India Women's qualification scenario after South Africa win : दक्षिण आफ्रिका महिला संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात बांगलादेश महिला संघावर विजय मिळवला. या विजयासह आफ्रिकेने ग्रुप १ मध्ये ८ गुणांसह उपांत्य फेरीच्या दिशेने कूच केली आहे आणि त्यामुळे भारतीय महिला संघाचे टेंशन वाढले आहे. भारतीय संघाचा अखेरच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना होणार आहे आणि आता एकच गोष्ट हरमनप्रीत कौरच्या संघाला या स्पर्धेत कायम ठेवू शकते.
बांगलादेशला प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ११७ धावाच करता आल्या. सलामीच्या दोन्ही फलंदाज जुआरिया फेर्डोस (०) व ताज नेहार ( १) या स्वस्तात माघारी परतल्या. त्यानंतर सोभना मोस्तरी व शर्मीन अख्तेर यांनी चांगला खेळ करताना तिसऱ्या विकेटसाठी ५६ धावा जोडल्या. शर्मीन २२ धावांवर बाद झाल्यानंतर सोभनाही ४२ धावांवर बाद झाली. या दोघी झटपट माघारी परतल्यामुळे बांगलादेशचा संघ पुन्हा बॅकफूटवर गेला. कर्णधार निगर सुलतानाने २० चेंडूंत नाबाद ३२ धावा करून संघाला ११७ धावांपर्यंत पोहोचवले.
WI vs SL 1st Test: आमिर जांगू-रोस्टन चेस यांनी क्रिकेटचा इतिहास-भूगोल बदलला... १४९ वर्षांत घडला नव्हता असा पराक्रम गाजवलाआफ्रिकेच्या नोंकुलूलेको एमलाबाने दोन विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवातही काही खास झाली नाही. कर्णधार लॉरा वोल्व्हार्ट भोपळ्यावर बाद झाली. तझमिन ब्रिट्सने २० व अनेरिए डेर्कसनने ४५ धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. पण, त्यानंतर आफ्रिकेच्या अन्य फलंदाजांना संघर्ष करावा लागला. आफ्रिकेला हे लक्ष्य कमी षटकांत पार करून नेट रन रेट सुधारण्याची संधी होती, परंतु विकेट गमावल्याने सामना शेवटच्या षटकांपर्यंत गेला.
मॅरिझने कॅप ( १६) व नॅडीने डी क्लेर्क ( १५) यांनी संघाची वाटचाल सुरू ठवली. विजयासाठी ५ धावा हव्या असताना क्लेर्स बाद झाली. ७ चेंडूंत ५ धावा असा सामना चुरशीचा बनला आणि आफ्रिकेच्या हाती चार विकेट्स होत्या. आफ्रिकेने शेवटच्या षटकात बाजी मारली आणि विजयामुळे त्यांची गुणसंख्या ८ झाली आहे.
IND vs IRE 2nd T20I : वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... भारतीय संघात दोन खेळाडूंचे पदार्पण; कोण आहेत ते? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हनभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या लढतीला आता महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतीय संघाचा नेट रन रेट २.२६८ असा दमदार असला तरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय, हा एकमेव पर्याय त्यांच्यासमोर आहे. कारण, हा सामना त्यांनी गमावल्यास ग्रुप १ मधून ऑस्ट्रेलियासह आफ्रिका उपांत्य फेरीत प्रवेश करेल.