शेजारी देशांमध्ये संघर्ष पेटला? पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर भीषण हल्ला, २९ जणांचा मृत्यू
GH News June 29, 2026 10:10 AM

इराण-अमेरिकेमध्ये पुन्हा संघर्ष भडकण्याची चिन्ह दिसत असताना पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्येही तणाव वाढला आहे. ४ सैनिकांच्या मृत्यूचं प्रत्युत्तर म्हणून केलेल्या हल्ल्यात अफगाणिस्तानातील २९ जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानने मध्यरात्री उशिरा केलेल्या हल्ल्याने खळबळ माजली आहे. अफगाणिस्तानच्या सीमेवर हा हल्ला करण्यात आला, त्यात २९ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानचे माहिती मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी हल्ल्याला दुजोरा दिला आहे.

पाकिस्तानच्या सैन्य दलाने पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर ठरवून हल्ले केले. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा, बलूचिस्तान, कराचीतील पाकिस्तानी रेंजर्स कँपवर हल्ले करण्यात आले होते. त्यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेवर हल्ले केले.

पाकिस्तानी सैन्याच्या दाव्यानुसार, अफगाणिस्तान हल्ले करून दहशतवाद्यांचे मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा नष्ट केल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केलाय. पाकिस्तानने अनेकदा अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केले आहेत. अफगाणिस्तानच्या तालिबानी सरकारने तहरीक-ए-तालिबान या पाकिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय दिला आहे. पाकिस्तानातील सर्व हल्ले याच दहशतवादी संघटनेने केले आहेत. या दहशतवादी संघटनेला पाठिंबा, संरक्षण, मदत करण्याचं काम अफगाणिस्तानचं तालिबानी सरकार करत असल्याचा आरोप आहे. पाकिस्तानने याच दहशतवादी संघटनेविरोधात लष्करी कारवाईचा धडाका लावला आहे.

पाकिस्तान सैन्याने सूत्रांच्या माहितीच्या आधारावर पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमाभागात ऑपरेशन राबवलं. त्यानंतर अफगाणिस्तानच्या पक्तिया प्रांत, पक्तिका प्रांत आणि कुनार प्रांतातील ३ दहशतवादी तळांना लक्ष्य केलं. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात २९ जणांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानवर झालेल्या हल्ल्यात ४ सैनिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेशी संबंधित असलेल्या जमात-उल-अहरार या संघटनेने स्वीकारली होती.

दहशतवादी संघटनेने पाकिस्तानच्या सिंध रेंजर्सच्या मुख्यालयावर हल्ला करण्यात आला होता. त्यात ४ जणांचा मृत्यू झाला होता. कराचीमधील सर्वात सुरक्षित भाग असलेल्या ठिकाणी हा हल्ला झाल्याने लोकांमध्ये भीतीचं वातवरण पसरलं होतं. दहशतवाद्यांनी मुख्यालयात घुसून गोळीबार आणि ग्रेनेड हल्ले केले. त्यावेळी केलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी सैन्याने ६ हल्लेखोरांना ठार केले होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.