सिया गोयल हिच्या आईचा मोठा दावा, पहिल्यांदाच थेट म्हटले, तिने हे..
Tv9 Marathi June 29, 2026 03:45 PM

केतन अग्रवाल प्रकरणात एका मागून एक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. त्यामध्येच आता आज सिया अग्रवाल आणि चेतन चाैधरी यांना कोर्टात हजर केले जाईल. काल लोणावळा पोलिसांनी, दोन्ही आरोपींना लोहगडावर नेले होते. पोलिस आज कोर्टात सिया आणि चेतन यांची पोलिस कोठडीची मागणी करू शकतात. या प्रकरणात अजून काही गोष्टींचा खुलासा होणे बाकी आहे. सिया आणि चेतन यांच्याकडून या हत्येचा सर्व कट शांत डोक्याने रचण्यात आला होता. यापूर्वीही केतन अग्रवाल याला मारण्याचा प्रयत्न सिया हिने केला. मात्र, त्यावेळी तो फसला. केतनच्या लग्नाबाबत सियाच्या कुटुंबियांनी तिला अनेकदा विचारणा केली. तिने केतनसोबते लग्न मान्य असल्याचेही सांगितले. केतन याच्यासोबत सिया गोयल सतत फिरत. केतन याने सियाचा वाढदिवस अत्यंत खास पद्धतीने साजरा केला. घरच्यांना ती कायमच आनंदी असल्याचेही सांगत.

लोणावळा पोलिसांनी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चाैधरी यांची कसून चाैकशी केली. यासोबतच सिया गोयल हिचे आई वडील यांचीही 12 तास चाैकशी केली. सिया हिचा भाऊ साहिल आणि चेतन चाैधरी मित्र होते. साहिलचीही पोलिसांनी चाैकशी केली. या प्रकरणात धक्कादायक दावे दररोज केली जात आहेत. नुकताच सियाचे वडील प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल यांनी एक मुलाखत दिली.

या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक गोष्टींवर थेट भाष्य केले. गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगताना दिसली की, सिया गोयल हिने पोलिस कोठडीत असताना बियरची मागणी केली. यावर तिच्या आईने खुलासा केला. सियाची आई म्हणाली की, पोलिसांनी आमची चाैकशी केली. त्यांनी जे जे विचारले, त्यासर्व प्रश्नांना आम्ही उत्तरे दिली. काही गोष्टी बोलल्या जात आहेत.

सियाने पोलिस कोठडीत असताना बियरची मागणी केली. पण आमची चाैकशी करणाऱ्या पोलिसांनी मला सांगितले की, सियाने अशी कोणतीही मागणी पोलिस कोठडीत असताना केली नाहीये. तिने बियर मागितली नाही. यादरम्यान सिया हिच्या आईने तिच्या शिक्षणाबद्दलही खुलासा केला. त्यांनी म्हटले की, सियाला शिक्षणात आवडत नव्हती, याबाबत आम्ही अगोदरच केतनच्या कुटुंबियांना सांगितले होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.