बिहारच्या बाँस घाट स्मशानभूमीचे आधुनिकीकरण, व्यवस्थापन आता ईशा आऊटरीचकडे
Tv9 Marathi June 30, 2026 02:45 AM

बिहार सरकारने पाटणा येथील बाँस घाट स्मशानभूमीचा विकास केला आहे. बाँस घाट येथील स्मशानभूमी चालवणे आणि तिच्या देखभालीची जबाबदारी ‘इशा आऊटरीच’ या संस्थेकडे सोपवली आहे. ‘इशा आऊटरीच’ ही ‘इशा’ची सामाजिक आणि पर्यावरणीय कल्याण शाखा आहे. तामिळनाडू सरकारसोबत भागीदारी करीत बिहार सरकारने स्मशानभूमी व्यवस्थापनाचा व्यापक अनुभव असल्याने ‘इशा आऊटरीच’ शी करार केला आहे. आशियातील सर्वात मोठ्या स्मशानभूमींपैकी एक असलेल्या बिहारच्या बाँस घाटाचा विकास पारंपरिक अंत्यसंस्कार विधींचे पावित्र्य जपत सुलभ आणि सुनियोजित अंत्यसंस्कार सेवा प्रदान करण्यासाठी केला आहे.

बाँस घाट स्मशानभूमीची प्रमुख वैशिष्ट्ये: 1. पायाभूत आराखडा

4.5 एकरात पसरेला बाँस घाट आशियातील सर्वात मोठा स्मशानभूमीपैकी एक आहे. पूर्व भारतातील सर्वात आधुनिक अंतिम संस्कार सुविधांचा सामील आहे. या स्मशानात एकसाथ 18 अंतिम संस्कार केले जातात आणि प्रतिदिन सुमारे 50 अंतिम संस्कार करण्यासाठी सक्षम आहे. ज्यामुळे कुटुंबियांना कुशल आणि सन्मानजनक सुविधा मिळते.

2.सोयी- सुविधा

हे स्मशान एक स्वच्छ, शांतपूर्ण आणि सुव्यवस्थित वातावरणात विद्युत तसेच पारंपारिक लाकडांच्या आधारे दोन्ही प्रकारे अंतिम संस्कार सुविधा मिळते. कुटुंबियांना त्यांच्या दु:खाच्या काळात सुलभ, पारदर्शक आणि संवेदनशील सहायता मिळू शकते.

3. शुल्क संरचना

या स्मशान भूमीत अंतिम संस्कारासाठी ₹3,500 शुल्क निर्धारित केले आहे. हा महानगर पालिकेच्या अंतर्गत किमान शुल्क आहे. यात वीज आणि देखभालीचा खर्चाचा समावेश आहे. लाकडांच्या आधारे केल्या जाणाऱ्या अंत्य संस्कारासाठी सेवा शुल्क ₹3,500 आहे. तर लाकडाचा खर्च कुटुंबियांना स्वतंत्रपणे करावा लागणार आहे.

4. दारिद्र्य रेषेखालील लोकांना निःशुल्क सेवा

ईशा आउटरिच बाँस घाट स्मशानात अंत्योदय अन्न योजना ( AAY ) कार्डधारकांना मोफत अंतिम संस्कार सेवा प्रदान केले जाणार आहे. यामुळे आर्थिक अडचणीच्या काळात अंत्यसंस्कारात बाधा येणार नाही याची काळजी घेतली जाते.

5. पर्यावरण संबंधी उपाय

सध्याच्या विद्युत भट्ट्यांचे संचलन जारी राखतानाचे ईशा आऊटरीच लाकडांच्या आधारित भट्ट्यांना एलपीजी आधारित भट्ट्यांमुळे टप्प्या टप्प्याने परिवर्तित करणार आहे.या बदलाने लाकडाचा खप आणि वायू प्रदुषणात उल्लेखनीय कमी येईल आणि पारंपारिक अंत्य संस्कारांचे पावित्र्य जपले जाईल.

ईशा आऊटरीचचा अनुभव

गेल्या १५ वर्षांहून अधिक काळापासून, ईशा आऊटरीच तामिळनाडू सरकारच्या भागीदारीने राज्यात स्मशानभूमींचे व्यवस्थापन आणि त्यांची देखभाल करीत आहे. सध्या ही संस्था ३३ स्मशानभूमींचे व्यवस्थापन करते आणि मृत्यूनंतरही सन्मानजनक पारंपारिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले जात आहे. संस्थेने आपल्या सेवा-केंद्रित सुविधांद्वारे १,२५,००० हून अधिक अंत्यसंस्कार पार पाडले आहेत.

ईशा आऊटरीच तामिळनाडूतील आपल्या सर्व स्मशानभूमींमध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत अंत्यसंस्कार सेवा प्रदान करते. ही सेवा आता पाटण्यातील बाँस घाट स्मशानभूमीपर्यंत विस्तारण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे सन्मानजनक अंतिम यात्रेच्या हक्कापासून वंचित राहावे लागू नये यासाठी ही योजना आखली आहे.

बिहारात विस्तार

बाँस घाट स्मशान तसेच, बिहार सरकार ने बेगूसराय ( सिमरिया ), भागलपुर, गया आणि सहरसा येथील स्मशान घाट ईशा आउटरीचकडे सोपवले आहेत. तर छपरा येथील स्मशान भूमी वाटपाची प्रक्रिया सुरु आहे. सध्या ईशा आउटरीचने केवळ बाँस घाट स्मशानाचे व्यवस्थापनाचे दायित्व सांभाळले आहे. या सर्व स्मशानभूमींचा मालकी हक्क बिहार सरकारकडे राहणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.