Joint Pain in monsoon: पावसाळा सुरू होताच अनेकांना सांधे (Joint Pain) आणि स्नायूंच्या वेदना वाढल्याची तक्रार जाणवते. विशेषतः ऑस्टिओआर्थरायटिस (Health), रुमेटॉईड आर्थरायटिस, दीर्घकालीन पाठ किंवा मानेचे दुखणे, सायटिका, फ्रोजन शोल्डर (Monsoon), टेंडन आणि लिगामेंटच्या दुखापती, फायब्रोमायल्जिया, क्रीडाजन्य दुखापती तसेच जुन्या फ्रॅक्चरमुळे होणाऱ्या वेदना असलेल्या रुग्णांमध्ये हा त्रास अधिक जाणवू शकतो. हवामानामुळे हे आजार होत नसले, तरी पावसाळ्यातील बदलांमुळे आधीपासून असलेल्या वेदना अधिक तीव्र जाणवू शकतात.
पावसाळ्यापूर्वी वातावरणातील हवेचा दाब (बॅरोमेट्रिक प्रेशर) कमी होतो. त्यामुळे सांध्यांभोवतीच्या ऊतींवर परिणाम होऊन संवेदनशील नसांवर अतिरिक्त ताण येतो. परिणामी वेदना आणि सांध्यांमध्ये कडकपणा वाढू शकतो. याशिवाय थंड आणि दमट वातावरणामुळे स्नायू आखडतात, त्यामुळे हालचाल करताना त्रास होतो. पावसाळ्यात शारीरिक हालचालीचा अभाव आणि घरात जास्त वेळ घरात राहण्यामुळे सांधे अधिक कडक होतात, स्नायू कमकुवत होतात आणि वेदना वाढण्याची शक्यता असते.
वेदनाशामक औषधे तात्पुरता आराम देतात; मात्र ते मूळ ऊतींचे नुकसान भरून काढत नाहीत. त्यामुळे दीर्घकाळ वेदना असलेल्या रुग्णांसाठी रिजनरेटिव्ह मेडिसिन हा पारंपरिक उपचारांसोबत पूरक पर्याय ठरू शकतो. या उपचारपद्धतीचा उद्देश शरीराच्या नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रियेला चालना देऊन ऊतींच्या पुनर्बांधणीस मदत करणे हा आहे.
रिजनरेटिव्ह उपचारांमध्ये लिव्हिंग ड्रग थेरपीद्वारे दाह कमी करण्यास आणि शरीराच्या नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रियेला चालना देण्याचा प्रयत्न केला जातो. एक्सोसोम थेरपी आणि मायक्रो डोस इन्फ्युजन (एमडीआय) थेरपी ही पेशींमधील कार्य सुधारण्यास, दाह नियंत्रित करण्यास आणि ऊतींच्या पुनर्निर्मितीस मदत करू शकतात. तर मायक्रोकरंट थेरपी वेदना कमी करणे, स्नायूंचे आकुंचन कमी करणे, रक्ताभिसरण सुधारणे आणि ऊतींच्या दुरुस्तीला चालना देण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या उपचारांसोबत फिजिओथेरपी, पुनर्वसन, योग्य आहार आणि जीवनशैलीतील अचुक बदल केल्यास रुग्णांसाठी वैयक्तिक गरजांनुसार उपचार योजना तयार करता येते.
सांधेदुखी किंवा स्नायूंच्या वेदनांकडे दुर्लक्ष न करता वेळीच निदान आणि योग्य उपचार घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पुढील सांध्यांचे नुकसान टाळता येते आणि दीर्घकालीन आरोग्य सुधारण्यास मदत होते.
पावसाळ्यात हवामानामुळे वेदना वाढू शकतात; मात्र योग्य जीवनशैली, नियमित शारीरिक हालचाली आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतल्यास हा त्रास नियंत्रणात ठेवता येतो. दीर्घकालीन वेदनेपासून आराम मिळतो आणि जीवनमान सुधारण्यासाठी सेल बेस उपचारपद्धती हा एक आशादायक पर्याय ठरू शकते.
डॉ. प्रदीप महाजन, रिजनरेटिव्ह मेडिसिन एक्स्पर्ट आणि स्टेमआरएक्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक
महत्त्वाच्या इतर बातम्या:
राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच