राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क July 08, 2026 08:43 PM

Sushant Singh Rajput Wanted to Play Sourav Ganguly:  भारतीय क्रिकेट संघातील स्टार क्रिकेटर (India Cricket) सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांच्या जीवनावर आधारीत 'दादा - द सौरव गांगुली स्टोरी' (Rajkumars Rao) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक अर्थात पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.  आज सौरव गांगुली यांचा 54 वा वाढदिवस.  त्यांच्या खास वाढदिवसाचे औचित्य साधत फिल्ममेकर्सने या सिनेमाचा फर्स्ट पोस्टर रिलीज केला आहे. दरम्यान, या सिनेमाचा पोस्टर रिलीज करताच, याला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे.   पण तुम्हाला माहित आहे का, या सिनेमात सुरुवातीला दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला काम करायचे होते.

 'दादा - द सौरव गांगुली स्टोरी' या सिनेमाचा पहिला पोस्टर आज  8 जुलै रोजी रिलीज करण्यात आला आहे.  अभिनेता राजकुमार राव मुख्य भूमिकेत असून, राजकुमार राव लॉर्ड्सच्या बाल्कनीतून सौरव गांगुली यांच्या स्टाईलने टीम इंडियाची जर्सी हातात घेऊन हवेत उंचावत असल्याचं दिसत आहे. याचा पोस्टर रिलीज होताच अनेकांनी हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता दर्शवली.

 'दादा - द सौरव गांगुली स्टोरी' या सिनेमात आधी सुशांत सिंह राजपुतला साकारायचा होता रोल (Sushant Singh Rajput wanted to play Sourav Ganguly in biopic)

हा पोस्टर समोर येताच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  पण तुम्हाला माहित आहे का की, या आधी या सिनेमात  प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतला मुख्य भूमिका साकारायची होती. रिपोर्ट्सनुसार, सुशांत सिंह राजपूतला गौरव गांगुली यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारायची होती.  त्यांची सौरव गांगुली यांच्या  बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा होती.     'एमएस धोनी:  द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमात सुशांत सिंह राजपुतने कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी यांची भूमिका साकारली होती. 

एमएस धोनी:  द अनटोल्ड स्टोरी'मध्ये काम केल्यानंतर तो मोठ्या पडद्यावर सौरव गांगुली यांची भूमिका साकारण्यास प्रचंड उत्सुक होता. पण सुशांतची ती इच्छा अपूर्ण राहिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार,  2018 साली सुशांतच्या टीमने  बायोपिकच्या संबंधित चर्चा करण्यासाठी सौरव गांगुली यांच्याशी संपर्क साधला होता. दरम्यान, त्यावेळेस  सौरव गांगुली हे बायोपिकसाठी तयार नव्हते. त्यांनी नम्रपणे हा प्रस्ताव नाकारला होता. तरीही सुशांतने  त्यांना, जेव्हा तयार होतील, तेव्हा मला आठवणीत ठेवून संपर्क साधा, असं सांगितलं होतं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

रोमान्स, लिपलॉक अन् भरपावसात.., 'टॉक्सिक'चं 'तबाही' गाणं रिलीज, यश-कियाराची केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांना फुटला घाम

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.