विरार - मुसळधार पावसामुळे वसईत दुर्घटना घडण्याच्या प्रकारात वाढ झाली असून, लागोपाठ पावसात तिसरा बळी गेला आहे. वसई फाटा येथील रिचर्ड कंपाऊंड मधील मणिचापाडा येथील बकरा कंपाउंड मध्ये काल दुपारी ३ वाजता ही घटना घडली आहे. बळी गेलेल्या मुलीचे नाव कविता दूधनाथ जैस्वाल असून ती गोरेगाव येथील राहणारी होती.
वसई विरारमध्ये मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी भरल्याने चालताना पाण्याचं अंदाज नागरिकांना येत नसल्याने अनेक जण खड्यात पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यातच वसई फाटा येथील रिचर्ड कंपाऊंड मधील मणिचापाडा येथील बकरा कंपाउंडमध्ये काल दुपारी ३ वाजता ही घटना घडली आहे. पुराच्या पाण्यात प्रवाहित झालेल्या नाल्यात अडकून कविता दूधनाथ जैस्वाल या २२ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मुलीला स्थानिक नागरिकाकडून रेष्क्यू करतानाचा लाईव्ह व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे पुराच्या पाण्याचा प्रवाह किती होता, हे समोर आले आहे. कविता दूधनाथ जैस्वाल असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव असून, मुळची जौनपुर (यूपी) मधील रहिवाशी असून, सध्या ती गोरेगांव (मुंबई) येथे राहत होती.
गोरेगाववरून ती बहिणीकडे आली होती. बहिणीच्या घरी जाताना तिला नाल्यातील पाण्याच्या प्रवाहचा अंदाज न आल्याने ती गटारात पडली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ तिला बाहेर कळण्यासाठी प्रयत्न केले पण वाचविण्यात यश आले नाही. यापूर्वी वसई विरार नालासोपा-यातील अतिवृष्टीचे दोन बळी गेले होते. त्यात एकाची ओळख पटली होती.
दोन्ही घटना ह्या वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडल्या होत्या. किशोर नामदेव लोखंडे (वय-५०) असे ओळख पटलेल्या व्यक्तीचे नाव असून, वसई पूर्वेतील मांगुळीपाडा, भोईदापाडा या परिसरात पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. त्यांचा मृतदेह वसई पूर्वेकडील मधुबन येथे मिळालं होता. तर दुसऱ्या मृत देहाची ओळख मात्र पटलेली नाही.