रोज नाश्त्यासाठी वेगळं काय बनवायचं, हा अनेकांच्या घरात नेहमीच प्रश्न असतो. सकाळच्या धावपळीत पटकन तयार होणारा आणि शरीरासाठी पौष्टिक पदार्थ बनवणं सोपं नसतं. अशा वेळी ओट्स अप्पे हा एक चांगला पर्याय आहे. हा पदार्थ कमी वेळात तयार होतो, खायला चविष्ट लागतो आणि आरोग्यासाठीही फायदेशीर असतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच तो आवडतो. एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा बनवावासा वाटेल असा हा नाश्ता आहे.
साहित्यमिक्सरमध्ये बारीक केलेले ओट्स
भिजवलेली उडीद डाळ
लाल तिखट
मीठ
काळी मिरी पावडर
बारीक चिरलेला कांदा
किसलेले गाजर
बारीक चिरलेली ढोबळी मिरची
तूप किंवा तेल
सर्वप्रथम भिजवलेली उडीद डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
त्यात ओट्सची पावडर, मीठ, लाल तिखट आणि काळी मिरी पावडर घालून चांगले मिसळा.
आता त्यात बारीक चिरलेला कांदा, किसलेले गाजर आणि ढोबळी मिरची घाला.
अप्पे पात्राला तूप किंवा तेल लावून गरम करा.
तयार केलेले मिश्रण अप्पे पात्रातील प्रत्येक साच्यात घाला.
एका बाजूने सोनेरी रंग आल्यावर अप्पे पलटून दुसरी बाजूही छान भाजून घ्या.
दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग आल्यावर गरमागरम अप्पे बाहेर काढा.
आवडीनुसार तुम्ही यामध्ये मटार, स्वीट कॉर्न किंवा इतर भाज्याही घालू शकता.