IND VS ENG 4TH T20I: भारतीय संघ जिंकत नसेल तर...! पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरचं मोठं विधान; म्हणाला, हे खेळाडू..
esakal July 10, 2026 05:45 AM

Shreyas Iyer post-match reaction vs England India Marathi Cricket Update : इंग्लंडने या मालिकेत वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाला चारीमुंड्या चीत केले. चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात इंग्लंडने आणखी एक सोपा विजय मिळवताना मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. १२ वर्षानंतर इंग्लंडने भारताविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका जिंकली. पराभवानंतर भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर याने संघाच्या कामगिरीबाबत स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

श्रेयस अय्यरच्या नाबाद ८० धावा सोडल्या,तर भारताचे अन्य फलंदाज अपयशी ठरले. शिवम दुबेने (२२) कर्णधारासह अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरला होता, परंतु ते संघाला १५८ धावांपर्यंत पोहोचवू शकले. इंग्लंडने हे लक्ष्य १३.५ षटकांत ९ विकेट्स राखून सहज पार केल. हॅरी ब्रूकने ३५ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ७९ आणि फिल सॉल्टने ४२ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह नाबाद ५९ धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ७० चेंडूंत १४६ धावा जोडल्या.

दोन किंवा अधिक सामन्यांच्या द्विदेशीय ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत इंग्लंडने प्रथमच भारताला हरवले. यापूर्वीच्या सहापैकी पाच मालिका भारताने जिंकल्या असून, एक मालिका अनिर्णित राहिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या द्विदेशीय मालिकेत (कोणत्याही फॉरमॅटमध्ये) भारताला शेवटचे दोन पराभव २०१८ च्या दौऱ्यावर (वन डे मालिकेत २-१ आणि कसोटी मालिकेत ४-१ ने) झाले होते. या मालिकेपूर्वी भारताने १२ पैकी ११ ट्वेंटी-२० मालिका जिंकल्या होत्या. २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांना १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते.  ( श्रेयस अय्यर एकटा लढला, विराट कोहलीचा विक्रम मोडला )

श्रेयस अय्यर म्हणाला,"पुन्हा एकदा निराशा पदरी आली. १५८ ही धावसंख्या धावफलकावर पुरेशी नव्हती. शेवटी आपण पाहिलंच की त्यांनी किती पटापट या धावांचा पाठलाग केला. जेव्हा आम्ही गोलंदाजीला आलो, तेव्हा मी गोलंदाजांना फक्त एकच सांगितलं की त्यांनी टप्प्यांवर नियंत्रण ठेवून एकाच लांबीवर सतत गोलंदाजी करावी. मिडल आणि लेग स्टंपच्या वर टाकलेल्या चेंडूंवर धावा काढणं कठीण जात होतं. पण आमच्याकडून तशी कामगिरी झाली नाही."

IND vs ENG 4th T20I : पुन्हा तेच... वैभव सूर्यवंशी IPL समजून खेळायला गेला अन् जोफ्रा आर्चरने पुन्हा कार्यक्रम केला... Video

"माझ्या स्वतःच्या कामगिरीवर मी नक्कीच खूश आहे, पण जर त्याचा संघाला विजय मिळवून देण्यात फायदा होत नसेल तर... सध्या आपला संघ एका संक्रमण काळातून जात आहे आणि आपल्याकडून चुका होणारच. परिस्थितीनुसार स्वतःला बदलणं किती महत्त्वाचं आहे, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. मला पूर्ण खात्री आहे की आपल्या संघात गोष्टी पटकन शिकणारे खेळाडू आहेत आणि ते स्वतःच्या कामगिरीचे योग्य मूल्यमापन करतील," असेही तो पुढे म्हणाला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.