99 टक्के लोकांना माहितीच नाही डीमार्टमध्ये खरेदी करण्यापूर्वीची ही अत्यंत महत्वाची गोष्ट, थेट एक युक्ती आणि..
Tv9 Marathi July 10, 2026 05:45 PM

डीमार्ट लोकांच्या आवडतीच्या ठिकाणांपैकी एक झाले. डीमार्टमध्ये एका छताखाली आपल्याला सर्व वस्तू आरामात मिळतात. विशेष म्हणजे अगदी स्वस्त दरात या वस्तू मिळतात. बाहेर बिस्किट पुडा जर 20 रूपयांना असेल तर डीमार्टमध्ये तो आपल्याला 15 रूपयांपर्यंत मिळतो. डीमार्टमध्ये वस्तू इतक्या स्वस्त मिळण्याचे कारणही मोठे आहे. डीमार्टच्या शाखा देशभरात आहेत. त्यामुळे ते एकदाच मोठी ऑडर कंपन्यांना देतात. थेट कंपनीतून वस्तू डीमार्टमध्ये पोहोचतात. यामुळे कंपन्या डीमार्टला अगदी स्वस्तामध्ये माल देतात. त्यामुळे इतर ठिकाणांपेक्षा डीमार्टमध्ये आपल्याला वस्तू अगदी स्वस्त मिळतात. विशेष म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच खरेदी करता येते. घरात लागणारी प्रत्येक वस्तू डीमार्टमध्ये अगदी सहज मिळते. शिवाय डीमार्टच्या बाहेर खाण्यापिण्याचे स्टॉलही असल्याने लहान मुलांना मॉलमध्ये फिरायला आल्यासारखे वाटते.

डीमार्टमध्ये स्वस्त तर वस्तू मिळतातच शिवाय त्यावर मोठी सवलतही मिळते. एका वर एक फ्री ही मोठी सवलत कायमच डीमार्टमध्ये असते. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की, डीमार्टमध्ये सर्वात जास्त सवलत आणि कमी गर्दीचा दिवस नक्की कोणता असतो. डीमार्टमध्ये वारांनुसार आणि तारख्यांनुसार बऱ्याचदा मोठी सवलत असते.

जर तुम्ही डीमार्ट खरेदीसाठी जात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. महिन्यातून फक्त एकच दिवस असा असतो, ज्यादिवशी डीमार्टमध्ये सर्वाधिक सवलत आणि गर्दीही कमी असते. त्यादिवशी डीमार्टमध्ये खरेदीसाठी कोणीही फिरकत नाही. अगदी कमी पैशांमध्ये तुम्ही महिनाभरचा किराणा अगदी सवलतीमध्ये खरेदी करू शकता.

ही तारीख दुसरी तिसरी कोणतीही नसून महिन्याची शेवटची तारीख असते. महिन्याची जर 30 तारीख शेवटची असेल तर त्याचदिवशी डीमार्टमध्ये खरेदीसाठी जा तिथे तुम्हाला मोठी सवलत मिळेल, शिवाय गर्दीही नसते. जर महिन्याच्या शेवटची तारीख 31 असेल तर 31 तारखेला डीमार्टमध्ये जा.

विक्री तज्ज्ञांच्या मते, वेगाने आणि स्वस्तामध्ये डीमार्टमध्ये खरेदी करायची असेल तर प्रत्येक महिन्याचा शेवटचा दिवस सर्वाधिक योग्य असतो. सकाळी डीमार्ट उघडल्यानंतर लगेच किंवा दुपारच्या सुरुवातीला गेल्याने आपल्याला गर्दी लागत नाही. शिवाय नक्की कोणत्या गोष्टीवर सवलत आहे हे देखील कळते आणि तेवढा वेळही खरेदीसाठी मिळतो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.