Protein-Packed Weight Loss Breakfast: तुम्हीही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, पण रोज तेच पोहे, उपमा किंवा सँडविच खाऊन कंटाळला असाल, तर हा हाय-प्रोटीन पालक-ओट्स रॅप नक्की ट्राय करा. ओट्स, पालक आणि लो-फॅट पनीरपासून तयार होणारा हा रॅप प्रोटीन आणि फायबरने भरपूर असल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहण्यास मदत करतो. शिवाय चव आणि पोषण यांचा उत्तम समतोल साधणारी ही रेसिपी नाश्ता, डबा किंवा वर्कआउटनंतरच्या मीलसाठीही परफेक्ट आहे. जाणून घेऊया ही सोपी आणि पौष्टिक रेसिपी.
साहित्य रॅपसाठी:2/3 स्कूप ओट्स
80 ग्रॅम उकडलेला पालक
2 हिरव्या मिरच्या
काही कढीपत्त्याची पाने
थोडी कोथिंबीर
चवीनुसार मीठ
½ कप पाणी
1 कांदा (बारीक चिरलेला)
1 टोमॅटो (बारीक चिरलेला)
अर्धा चीज क्यूब (किसलेला)
100 ग्रॅम लो-फॅट पनीर (किसलेले किंवा चुरलेले)
1 टेबलस्पून लाल तिखट
1 टेबलस्पून गरम मसाला
1 टेबलस्पून धणेपूड
चवीनुसार मीठ
मिक्सरच्या भांड्यात ओट्स, उकडलेला पालक, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ आणि अर्धा कप पाणी घालून गुळगुळीत बॅटर तयार करा.
एका बाऊलमध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो, किसलेले लो-फॅट पनीर, किसलेले चीज, लाल तिखट, गरम मसाला, धणेपूड आणि मीठ घालून स्टफिंग तयार करून घ्या.
नॉन-स्टिक तवा गरम करून त्यावर तयार बॅटर पसरवा आणि पातळ रॅप बनवा.
रॅप एका बाजूने शिजल्यानंतर पलटवा आणि दुसऱ्या बाजूनेही छान भाजून घ्या.
तयार रॅपवर पनीरचे स्टफिंग समान प्रमाणात पसरवा.
रॅप घट्ट गुंडाळून घ्या आणि छोटे-छोटे तुकडे करून गरमागरम सर्व्ह करा.
हा हाय-प्रोटीन पालक-ओट्स रॅप नाश्ता, संध्याकाळचा स्नॅक किंवा वर्कआउटनंतरचा हेल्दी मील म्हणून उत्तम पर्याय आहे.