आजचे पंचांग 11 जुलै 2026! त्रिपुष्कर योगासह शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि दिनविशेष जाणून घ्या
esakal July 11, 2026 10:45 AM

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀️ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀️ सूर्योदय – ०६:०८

☀️ सूर्यास्त – १९:१०

चंद्रोदय – २७:२६

⭐ प्रात: संध्या – ०४:५६ ते ०६:०८

⭐ सायं संध्या – १९:१० ते २०:२२

⭐ अपराण्हकाळ – १३:५७ ते १६:३३

⭐ प्रदोषकाळ – १९:१० ते २१:२१

⭐ निशीथ काळ – ००:१७ ते ०१:००

⭐ राहु काळ – ०९:२३ ते ११:०१

⭐ यमघंट काळ – १४:१६ ते १५:५४

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त– १४:१६ ते १५:५४

अमृत मुहूर्त– १५:५४ ते १७:३२

विजय मुहूर्त— १४:४९ ते १५:४१

⏳ कार्यसिद्धी वेळा – ११:२० ते १३:०५ | २१:२१ ते २२:४९

⚠️ कार्यनाशक वेळा – ०६:०८ ते ११:२० | १३:०५ ते २१:२१ | २२:४९ ते २४:००

मुंबई बंदर भरती/ओहोटी – भरती: ०२:३० ते ०९:२२ | ओहोटी: ०९:२२ ते १६:१७ | भरती: १६:१७ ते २१:५४ | ओहोटी: २१:५४ ते २७:३०

ग्रहमुखात आहुती – राहु (अशुभ) ०७:२३ नं. केतु (अशुभ)

अग्निवास – पृथ्वीवर (दिवसभर)

️ शिववास – २२:५० पर्यंत नंदीवर असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे त्यानंतर भोजनात असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे

शालिवाहन शक १९४८

संवत्सर पराभव

अयन – उत्तरायण

ऋतु – ग्रीष्म

मास – ज्येष्ठ

पक्ष - कृष्ण पक्ष

तिथी – द्वादशी (२२:५० नं.) त्रयोदशी

वार – शनिवार

नक्षत्र – कृत्तिका (०७:२३ नं.) रोहिणी

योग – गण्ड (२१:०७ नं.) वृद्धि

करण – कौलव (१२:०२ नं.) तैतिल

चंद्र रास – वृषभ

सूर्य रास – मिथुन

गुरु रास – कर्क

दिनविशेष – हरिवासर स.०६.३९ प. (यानंतर एकादशीचा उपवास सोडावा), संत निवृत्तिनाथ पुण्यतिथि (त्र्यंबकेश्वर), गुरु वार्द्धक्यारंभ:, त्रिपुष्करयोग ०७.२३ प.

विशेषआकाशात सध्या एक अत्यंत दुर्मिळ, अनाकलनीय आणि तितकीच चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देवगुरु बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह सध्या आकाशात 'अतिचारी' गतीने धावत आहे. शनि महाराज मीन राशीत 'वक्री' होत आहेत. या दोन गोष्टींचा सामान्य जनांच्या दैनंदिन आयुष्यावर जो प्रभाव पडणार आहे, हे सांगणारा हा video विशेषतः "आर्थिक गुंतवणूकदारांसाठी" अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

या दोन खगोलीय घटनांमुळे पावसावर काय परिणाम होणार, शेतकऱ्यांच्या दृष्टीने commodity market मध्ये कोणती हालचाल दिसून येणार आणि मुख्य म्हणजे शेअर बाजारावर काय परिणाम होणार याबदल सांगत आहेत पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक श्री. गौरव देशपांडे.

https://youtube.com/watch?v=t8x4YrfXXBM&si=Eb0tDNrVGkv3ODy9

शुभाशुभ दिवस - शुभ दिवस

श्राद्ध तिथी - द्वादशी श्राद्ध

आजचे वस्त्र – निळे/काळे

स्नान विशेष – काळे तिल किंवा दारूहळद वनस्पतीचे चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे.

उपासना – भीमरूपी स्तोत्राचे पठण आणि ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा.

दान – सत्पात्री व्यक्तीस नीलमणि, काळे उडीद, तेल, तिळ, कुळिथ, लोखंड दान करावे

तिथीनुसार वर्ज्य – मसूर

दिशाशूल उपाय – दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा करण्यापूर्वी काळे उडीद खाऊन बाहेर पडावे.

चंद्रबळ – वृषभ , कर्क , सिंह , वृश्चिक , धनु , मीन — या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.