Paithan: संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात पहिले रिंगण उत्साहात; मिडसांगवीत भक्तिमय वातावरण
esakal July 11, 2026 02:45 PM

चंद्रकांत तारु

पैठण: शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या आषाढी एकादशी पालखी सोहळ्याचा पंढरपूरकडे प्रवास सुरू असून, अहिल्यानगर जिल्ह्यातील मिडसांगवी (ता. पाथर्डी) येथे पालखी सोहळ्यातील पहिले रिंगण उत्साहात पार पडले. वारकरी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पारंपरिक सोहळ्याचा आनंद लुटला.

श्रीक्षेत्र पैठण येथून चार दिवसांपूर्वी नाथांचे वंशज तथा पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ बुवा गोसावी यांच्या नेतृत्वाखाली पालखी दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. परंपरेनुसार गावोगावी मुक्काम करत हा पालखी सोहळा मिडसांगवी येथे दाखल झाला.यावेळी ग्रामस्थांनी पालखीचे उत्स्फूर्त स्वागत करत संत एकनाथ महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले.

Datia Bypoll BJP Crisis : भाजपने माजी गृहमंत्र्यांचे तिकीट कापले, नाराज कार्यकर्त्यांकडून शहरात जाळपोळ, महामार्ग रोखला; पोलिसांवरही दगडफेक

भजन-कीर्तनानंतर रिंगण सोहळा रंगला. सुमारे अर्धा तास चाललेल्या या रिंगणाने पंचक्रोशीतील भाविकांचे लक्ष वेधून घेतले. यामुळे वारकऱ्यांच्या जयघोषाने परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेले होते. दुपारी बारा वाजता सोहळा संपल्यानंतर पालखी पुढील मुक्कामाच्या दिशेने रवाना झाली. यावेळी पालखीला निरोप देण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र जमले होते. दरम्यान, या मिडसावंगी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून परंपरेप्रती असलेली श्रद्धा व्यक्त केली.

India A vs Nepal: BCCI चा मोठा निर्णय! भारत 'अ' संघ पहिल्यांदाच नेपाळ दौऱ्यावर; डिसेंबरमध्ये रंगणार ऐतिहासिक T20 मालिका मिडसावंगी गावाने रिंगण सोहळ्याची जपली अखंड परंपरा

संत एकनाथ महाराजांच्या पालखी दिंडी सोहळ्याला साडेचारशे वर्षांची परंपरा लाभली असून, यंदा हा ४२७ वा पालखी सोहळा आहे. शतकानुशतके ठरलेल्या मुक्कामांच्या गावांमध्ये पालखी आगमनाची ग्रामस्थ वर्षभर आतुरतेने वाट पाहतात. पाल येणार असल्याच्या दिवशी गावातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांसह सर्वजण स्वागतासाठी एकत्र येतात. ही परंपरा आजही अखंडपणे जपली जात असल्याची माहिती मिडसावंगी येथील ग्रामस्थांनी दिली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.