शेतकरी कर्जमाफीसाठी ऑगस्ट उजाडणार? रोहित पवारांचा सरकारला मोठा इशारा… पुन्हा आंदोलन छेडणार?
Tv9 Marathi July 11, 2026 03:45 PM

Rohit Pawar on Farmer Loan Waiver: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 मधील निकषात मोठ्या बदलाची घोषणा शुक्रवारी विधानसभेत केली. यापूर्वी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. पण त्याचवेळी कर्जमाफीचा मुहूर्त मात्र लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 30 जून रोजी कर्जमाफी मिळणार होती. हा मुहूर्त टळल्यानंतर 5 जुलै ही तारीख देण्यात आली. ही तारीखही मागे पडली आहे. आमदार रोहित पवार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. त्यात कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना ऑगस्ट 2026 पर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता वर्तवली आहे. शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लागला आहे.

कर्जमाफीसाठी मोठा विलंब?

काल अधिवेशन संपत असताना अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. सरसकट दोन लाखांची मदत व्हावी अशी आमची मागणी होती. पंढरपुर मधील अन्नत्याग आंदोलनात आम्ही ही मागणी केली होती. ⁠२६ -२७ वर्षांची अट त्यांनी काढली. शेतकरी आक्रमक होत आहे हे सरकारला कळलं. ⁠शेतकरी याची एकजुट केल्यानंतर सरकला एकपाऊल मागे यावा लागलं. सरकारचे आभार मानतो, असे आमदार रोहित पवार म्हणाले.

अनेक आमदार खासदार सत्तेत गेले. अनेक लोकांनी माझ्या उपोषणावर टीका केली होती की हा काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला आहे म्हणून पण आम्ही यासाठी संघर्ष केला. प्रामाणिक प्रयत्न केला तर यश मिळतं. काही मागण्या मान्या झाल्या नाहीत, बीड मधील शेतकऱ्यांना ८०० कोटी मिळाले नाही. मनरेगा पैसे थकीत आहे. वीज मिळत नाही या संदर्भात आम्हाला संघर्ष करावा लागेल. सरकारने आयकर विभागाकडे आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे. लाडकी बहीण योजनेला अशीच माहिती मागितली होती. त्यासाठी तर चार महिने लागले होते, असे सूचक विधान रोहित पवार यांनी केले.

३-४ लाख शेतकरी हे आयकर विभागाच्या माहितीवरून वगळण्यात येतील अशी माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री म्हटले होते की कोणतीच अट नाही. आयकर विभागाची मीहीती मागवतोय यासाठी कर्ज माफी लांबवता येत नाही. सरकारने वेळ न घालवत लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. नाही तर आम्ही ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात विदर्भात मोठ आंदोलन करु, असा इशाराच आमदार रोहित पवार यांनी दिला. त्यामुळे कर्जमाफीसाठी अजून चार महिने थांबावे लागतात की ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागते याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहे.

अजितदादांच्या अपघाताप्रकरणी पुन्हा पत्रकार परिषद

काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या विमान अपघातातील तपासाविषयी आणि अहवालाविषयी सभागृहात माहिती दिली. त्यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.एआयबीचा रिपोर्ट मिळण्यासाठी तीन ते चार वर्ष लागतात. ⁠हा टेकनिकल रिपोर्ट असतो . ⁠अजित पवार यांच्या पहिल्या पुण्यतीथीच्या दरम्यान येत असेल काही प्रमाणात आपण केलेल्या प्रयत्नांना यश आहे.⁠व्हीएसआर कंपनी चे संबंध कसे आहेत हे मी २८ तारखेला पत्रकार परिषद घेणार असल्याचे रोहित पवार यांनी जाहीर केले.

एकनाथ शिंदे यांची ताकद वाढली

देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत गेले. तर त्यांच्या जागी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री होतील असे भाष्य खासदार संजय राऊत यांनी थोड्यावेळापूर्वी पत्रकार परिषदेत केले. त्यावर बावनकुळे हे एकटेच नाहीत तर एकनाथ शिंदे यांचीही ताकद वाढल्याचे रोहित पवार म्हणाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.