पाचगणी : भोसे खिंड येथील ‘अतिथी व्हेज-नॉनव्हेज’ हॉटेलच्या परिसरात दारूच्या नशेत घरात डोकावून पाहिल्याच्या कारणावरून तरुणाचा लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून खून (Bhose Khind youth murder news) करणाऱ्या चारही संशयितांना पाचगणी पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या सात तासांत शिताफीने अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, १४ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी, की इंदापूर (जि. पुणे) तालुक्यातील भिगवण येथील अक्षय रमेश जाधव (वय २७) हा तरुण आपल्या मित्रांसह ८ जुलैला भोसे येथील हॉटेल अतिथीमध्ये मुक्कामासाठी आला होता. तेव्हा ही घटना घडली.
Tukaram Mundhe FDA Action : गुजरात-एमपी टू जळगाव...! तुकाराम मुंडेंनी चार्ज घेताच 'गुटखा किंग'चे धाबे दणाणले; गुटखा माफिया एकमेकांच्या उठले जिवावर, सूड उगवण्याचा प्रयत्नयाप्रकरणी सूर्यकांत चंद्रकांत गोळे (वय ३७, रा. भोसे खिंड), अविनाश सतीश भोसले (वय ३१, रा. बावधन, वाई), राहुल जनार्दन राजपुरे (वय ३७, रा. कणूूर, वाई) आणि अमोल गेणदेव वाडकर (वय ३६, रा. चिखली, वाई) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मृताचा मित्र विशाल अजित जाधव (रा. बोरी, इंदापूर) याने बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर हा गुन्हा पाचगणी पोलिस ठाण्याकडे वर्ग झाला होता.