नागपूर: जंगलात हळूहळू दिवस मावळू लागला होता. वेळ कमी होता आणि समोर होते मानवी बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्याचे आव्हान. पारंपारिक पद्धतीने मचान बांधायला वेळ नव्हता. अशावेळी वनविभागाच्या इतिहासात कधीही न घडलेला धाडसी निर्णय घेतला गेला. तो होता वाघाला चकवण्यासाठी स्वतःच पिंजऱ्यात कैद होण्याचा आणि तो यशस्वी झाला. वेलतूरच्या जंगलात हा थरारक प्रकार घडला.
ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधील सर्वच कामे आटोपल्यानंतर बुधवारी आठ जुलैला दुरध्वनी वाजला. वाघ पकडण्याच्या सूचना आल्या. आमची चमू थेट पोहचली कुही तालुक्यातील वेलतूरच्या जंगलात. गाडीच्या आवाजाने वाघ शिकारीच्या जवळ येत नव्हता. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियल चौरागडे आणि वनरक्षक प्रतीक घाटे यांनी न भीता आणि पिंजऱ्यात कैद झाले.
RSS Belagavi Meeting : 'आरएसएस'च्या बैठकीनंतरच साहित्यिक कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं वादग्रस्त वक्तव्य, नव्या वादाला फुटलं तोंडतेव्हा मनात कर्तव्याची भावना आणि अथांग आत्मविश्वास होता. वाघाला संशय येऊ नये म्हणून त्यांनी वाघ पकडण्याच्या लोखंडी पिंजऱ्याला झाडांच्या फांद्यांनी झाकून घेतले. दोघेही थरथरतच पिंजऱ्यात जाऊन बसले. त्यांना सोडून वनविभागाचे वाहन निघून गेले. तशीच जंगलातली जीवघेणी शांतता अधिक गडद झाली.
श्वास रोखला तो थरारक क्षणलोखंडाचे काही गज आणि झाडांच्या फांद्या, एवढंच अंतर होते साक्षात मृत्यू आणि या दोन जिवांमध्ये. वाघाच्या श्वासाचा आवाज आणि त्याचा अंगाचा गंध दोघांनाही येत होता. हृदयाचे ठोके इतके वाढले होते की, कदाचित त्याचा आवाज वाघाच्या कानावर पडेल की काय, असे वाटू लागले. हालचाल तर दूर, साधा सुस्कारा सोडण्याचीही सोय नव्हती. जर वाघाला जराही संशय आला असता, तर पिंजऱ्याच्या गजांमधून तो एका फटक्यात दोघांचा खेळ खल्लास करू शकत होता. अशा स्थितीत, डोळ्यात भीतीने अश्रू आणि कमालीचा संयम ठेवून दोघेही कित्येक तास श्वास रोखून बसले होते. हा कर्तव्यासाठी प्राण पणाला लावणाऱ्या जिद्दीचा लढा होता.
IND vs ENG Weather Update: भारत-इंग्लंड शेवटच्या टी२० सामन्यात पावसाचा धुमाकूळ की होणार पूर्ण खेळ? हवामान खात्याने दिला 'हा' इशारा...अखेर पाऊस ओसरला, वाघ उठला आणि डॉ. प्रियल यांनी धाडसाने अचूक निशाणा साधत डार्ट मारला. वाघ बेशुद्ध झाला आणि पिंजऱ्यात कोंडून घेतलेल्या त्या दोन जिवांनी अखेर मोकळा श्वास घेतला. वाघाला बेशुद्ध करताच वन विभागाच्या चमूला मोबाईलवर संपर्क साधत बोलवून घेतले. वाघाला जेरबंद करून ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये आणले गेले. विशेष म्हणजे या वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने केलेल्या युक्तीचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर ही थरारक घटना उघड झाली. वन विभागाने वाघ पकडल्याची कोणतीही माहिती माध्यमांना दिलेली नाही.
..आणि साक्षात मृत्यू पाठीशी येऊन झोपला !गाडी जाताच निसर्गाने जणू या दोन जीवांची परीक्षा घेणे सुरू केले. अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसाच्या आवाजात जंगलात इतर कुणाची चाहुल लागणे कठीण झाले होते. इतक्यात, झाडीतून तो वाघ संथ पावलांनी बाहेर आला. तो शिकारीच्या जवळ पोहोचला, पण पाऊस जास्त असल्याने हुशार वाघाने आसऱ्याचा शोध सुरू केला. जेव्हा वाघ थेट त्यांच्याच पिंजऱ्याच्या अगदी पाठीमागच्या बाजूला येऊन अंग टाकून झोपला आणि पिंजऱ्यात बंद असलेल्या डॉ. प्रियल आणि प्रतीक यांच्या काळजाचा ठोकाच चुकला.
मृत्यूच्या जबड्यात हात घालून शौर्याची ‘हॅटट्रिक’महिला केवळ चूल आणि मूल सांभाळत नाहीत, तर मृत्यूच्या जबड्यात हात घालून कर्तव्य पूर्ण करू शकतात, हे डॉ. प्रियल यांनी पुन्हा दाखवून दिले. यापूर्वी ५ मार्चला महिला दिनी पहिला, १० जूनला देवलापार येथे दुसरा आणि आता वेलतूरमध्ये तिसरा वाघ जेरबंद करून त्यांनी शौर्याची ‘हॅटट्रिक’ केली आहे. पिंजऱ्यातून सुखरूप बाहेर पडल्यानंतर जेव्हा वाघाला नागपुरात आणले गेले, तेव्हा वकर्मचाऱ्यांच्या डोळ्यात या ‘वाघिणी’बद्दल अभिमान दाटून आला होता.