Rupali Bhosle Video Viral: 'आई कुठे काय करते' या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रूपाली भोसले सध्या तिच्या 'लपंडाव' मालिकेमुळे चर्चेत आहे.पण या मालिकेचा सेटवरील एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय.या व्हिडिओमुळे सुरुवातीला अनेकांना टेन्शन आलंय. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री रूपाली भोसलेच्या चेहऱ्यावर खरचटल्याच्या जखमा, रक्तखुणा दिसताहेत. तिच्या हातावरही जखमा दिसतात.तिच्या आजूबाजूला तीन-चार लोक या जखमा पुसताना दिसतात. त्यामुळे चाहत्यांना रूपालीला नेमकं काय झालं? याचा प्रश्न पडलाय. पण याचे उत्तरही याच व्हिडिओमध्ये प्रेक्षकांना मिळतं.
'लपंडाव' मालिकेत सखी कान्हा आणि मनस्वीनी यांच्या नाट्यमय घडामोडींमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. या मालिकेत एका मागून एक ट्विस्ट येत आहेत.नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोड मध्ये एका भीषण अपघाताच्या प्रसंगानेही प्रेक्षकांना खिळवून ठेवलेलं. हा प्रसंग खरा वाटावा यासाठी मालिकेच्या संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. रूपालीच्या चेहऱ्यावर आणि हातावर असलेल्या जखमांच्या खुणा या मेकअपने एवढ्या खऱ्यासारख्या तयार केल्या आहेत की हा मेकअप करण्यासाठी जेवढा वेळ लागला नाही तेवढा तो काढण्यासाठी लागत असल्याचं रूपालीने प्रेक्षकांना सांगितलं.
View this post on Instagram
हा मेकअप तीन -तीन लोक काढत आहेत. अभिनेत्री रूपाली भोसलेने मेकअप टीमचं कौतुक करत एक व्हिडिओ शेअर केलाय.या व्हिडिओवर प्रेक्षकांनीही त्यांचं कौतुक केलंय. लपंडाव मालिकेतील ठराविक अपघाताच्या सीन साठी अभिनेत्री रूपाली भोसलेने विशेष मेहनत घेतली असून हा सीन वास्तववादी वाटण्यासाठी केलेल्या तयारीचा व्हिडिओ तिने शेअर केलाय.
सध्या अनेक मालिका TRP च्या शर्यतीत पुढे राहण्यासाठी मालिकांमध्ये, कथानकात नवनवे बदल करत आहेत. एखादं प्रसंग, थरार दाखवण्याकरता पडद्यामागे किती मेहनत असते याचे अनेक प्रसंग, सीन कलाकार शेअर करताना दिसतात. लपंडाव मालिकेत महत्वाच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री रुपाली भोसलेने सध्या हा व्हिडिओ शेअर करत पडद्यामागे घडत असलेल्या टीमवर्कचं कौतुक प्रेक्षकांसोबत शेअर केलंय. ती म्हणाली, या गेटअपसाठी तयार व्हायला खूप वेळ लागतो. सरकार आणि तेजस्विनी असे दोन लूक करावे लागतात. जितका वेळ तयार व्हायला लागतो, तितकाच वेळ मेकअप काढण्यासाठीही लागतो. आमची मेकअप टीम प्रत्येक गोष्टीवर अतिशय बारकाईने काम करते. कधी कधी खूप धावपळ होते, पण जेव्हा प्रेक्षकांकडून या पात्रावर आणि मालिकेवर कौतुकाचा वर्षाव होतो तेव्हा सगळी मेहनत सार्थकी लागल्यासारखं वाटतं. त्यामुळे आणखी चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळते."