IND vs ENG 5th T20: सलग पाचव्या सामन्यात श्रेयस अय्यरने जिंकली नाणेफेक, संजूला संधी; तर वैभव आऊट
GH News July 11, 2026 10:13 PM

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाने पाच सामन्यांची टी20 मालिका गमावली आहे. आता या मालिकेतील शेवटचा सामना होत आहे. मालिका गमावली असली तरी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पहिल्या विजयाची वाट क्रीडाप्रेमी पाहात आहे. कारण आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यात टीम इंडियाने एकही विजय मिळवलेला नाही. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर टीका होत आहे. त्यामुळे पाचव्या सामन्यात विजयाची अपेक्षा आहे. असं असताना टीम इंडिया पाचव्या सामन्यासाठी मैदानात उशिराने पोहोचली. वाहतूक कोंडीत अडकल्याने टीम इंडियाला मैदानात पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे सामना सुरू होण्यास अर्धा तास उशीर झाला. नाणेफेकीचा कौल संध्याकाळी 6.30 ऐवजी संध्याकाळी 7.15 वाजता झाला. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल करण्यात आला आहे.

नाणेफेकीचा कौल भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच प्लेइंग 11 मध्ये दोन बदल असल्याचं सांगून सूर्यांश शेडगे आणि संजू सॅमसन हे संघात परतले आहेत. तर वैभव सूर्यवंशीला बसवण्यात आलं आहे.  कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. खेळपट्टीमध्ये फारसा बदल होणार नाही. या मालिकेत आम्ही सर्व काही पाहिले आहे, आम्ही आव्हानासाठी तयार आहोत. खेळाडूंनी रुसून बसण्याऐवजी खंबीर मानसिकता ठेवावी, एवढीच माझी इच्छा आहे. वर्तमानात जगायला हवे आणि जे घडले आहे त्याचा विचार करणे थांबवायला हवे. आमच्या संघात दोन बदल आहेत. वॉशिंग्टनच्या जागी शेडगे आणि सूर्यवंशीच्या जागी संजू संघात आले आहेत.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, प्रसीद कृष्णा.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक), हॅरी ब्रुक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टंग.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.