Ladki Bahin : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आली, या तारखेला खात्यात पडणार जून महिन्याचे पैसे; मोठी अपडेट समोर!
Tv9 Marathi July 12, 2026 12:45 AM

Ladki Bahin Yojana : राज्यातील पात्र लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदतीच्या रुपात दिले जातात. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाखो महिलांना याचा फायदा होतो. आता जून महिन्याचे पैसे अद्याप लाडक्या बहिणींना मिळालेले नाहीत. याबाबातच आता पैसे मिळण्याची संभाव्य तारीख समोर आली आहे.

जून महिन्याचे पैसे कधी मिळणार?

सध्या जुलै महिन्याचे दहा दिवस संपलेले आहेत. परंतु तरीदेखील लाडक्या बहिणींना जून महिन्याचे 1500 रुपये मिळालेले नाहीत. लाडक्या बहिणींना फक्त मे महिन्यापर्यंतचाच निधी देण्यात आला आहे. आता मात्र जून महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार, याची अंदाजित तारीख समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यासाठी निधीचे वितरण केले जाऊ शकते. त्यानंतर 17 जुलैपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळू शकतात. सरकारने मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. ही एक संभाव्य तारीख आहे.

80 लाख लाडक्या बहिणी अपात्र

लाडक्या बहिणींना आतापर्यंत मे महिन्याचे पैसे मिळालेले आहेत. मे महिन्याचे पैसे हे 15 जूननंतर मिळाले होते. तर एप्रिल आणि मार्च या दोन महिन्यांचे एकत्र 3000 रुपये लाडक्या बहिणींना देण्यात आले होते. ही रक्कम मे महिन्यात देण्यात आली होती. सध्या राज्यात 1 कोटी 70 लाख लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ दिला जातो. तर साधारण 80 लाख लाडक्या बहिणींचे नाव यादीतून हटवण्यात आले आहे.

लाडक्या बहिणींचे नाव का हटवण्यात आले?

राज्यभरातून साधारण 80 लाख महिलांचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून हटवण्यात आले आहे. ई-केवायसी न करणे, कागदपत्रांत त्रुटी आढळणे, योजनेच्या निकषात न बसणे अशी वेगवेगळी कारणं यामागे आहेत. दरम्यान, आता भविष्यात लवकरच ई-केवायसी सुरू होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय. याबाबतची सकारात्मकता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच दाखवलेली आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.