ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर किसन कथोरे गटाचे वर्चस्व कायम.
अरुण बाळू पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली.
भाग्यश्री भोईर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपाठोपाठ आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय चाणक्यनीतीचा करिष्मा दिसून आला. संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पुन्हा एकदा आमदार किसन कथोरे गटाने आपलं वर्चस्व राखले आहे. कथोरे यांचे खंदे समर्थक अरुण बाळू पाटील यांची टीडीसीसी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झालीय तर भाग्यश्री भोईर यांची उपाध्यक्षपदी निवड झालीय.
मोठी बातमी! चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होणार? राजकीय वर्तुळात खळबळसंचालक निवडीपासून ते अध्यक्ष पदाच्या निवडीपर्यंत टीडीसी बँकेची निवडणूक अत्यंत संघर्षमय राहिली. या निवडणुकीत सहकार पॅनलने १७ संचालक निवडून आणत माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या परिवर्तन पॅनलला आधीच धक्का दिला होता. त्यामुळे अध्यक्षपदी कुणाची निवड होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं होतं.
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीत सहकार पॅनलविरुद्ध परिवर्तन पॅनल अशी लढत झाली. पण बहुजन विकास आघाडीचे बँकेवर वर्षानुवर्षे असणारे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांनी भाजप आणि शिवसेना या दोन्हीही पक्षांचे उमेदवार दोन्ही पॅनलमध्ये उभे केले होते. या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीचे दोन्ही पॅनलमध्ये मिळून १४ उमेदवार निवडून आल्याने अध्यक्षपदावर कोणाचा उमेदवार निवडून येतो हे पाहणे रंजक ठरले होतं.
आणखी एक पक्ष फुटणार? भाजपकडून आमदारांना मंत्रिपदासह ३० कोटींची ऑफर; आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळया रंजक राजकीय अंकानंतर झालेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीचे १४ तर बहुजन विकास आघाडीचे ७ उमेदवार यांनी मतदान केले. विशेष म्हणजे निवडणुकीतील पॅनलच्या माध्यमातून एकमेकांसमोर उभे ठाकलेले भाजपचे किसन कथोरे आणि कपिल पाटील या दोघांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र एकजूट दिसून आली, हा रवींद्र चव्हाण यांच्या राजकीय प्रगल्भतेचा परिणाम असल्याचे सांगितले जातंय. मात्र त्याचवेळी शिवसेनेचे एक मत फुटल्याने एकनाथ शिंदे यांना हादरा बसलाय.
थोडक्यात, या राजकीय नाट्यानंतर आता ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद भाजपा-शिवसेना महायुतीकडे गेले आहे.