मोशी दुर्घटनेत मृतांचा आकडा ७ वर, भावेश वाणी यांचा दुर्देवी मृत्यू
Webdunia Marathi July 12, 2026 01:45 AM

social media

मोशी येथील वेस्ट-टू-एन्जर्जी प्रकल्पाच्या इमारतीवरील कचऱ्याचा ढीग कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता ७ वर पोहोचला आहे. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेले भावेश वाणी यांचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाली आहे. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

ALSO READ: पुण्यात कात्रजमधून ५.७९ कोटी रुपयांचे एमडी अमली पदार्थ जप्त, एकाला अटक

शोध मोहिमेत नागरिकांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना रुग्णालयाने तपासणीत मृत घोषित केले. या दुर्घटनेत आता पर्यंत सात मृतदेह हाती लागले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

ALSO READ: पुण्यात भूमी अभिलेख फेरफार प्रकरणी एसडीएम, तहसीलदार आणि इतर १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

या भीषण दुर्घटनेत एकामागून एक ७ जणांचे मृतदेह हाती लागल्याने संपूर्ण परिसरात अत्यंत भीतीचे आणि शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. एनडीआरएफ, लष्कर आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून घटनास्थळी रात्रीच्या वेळीही सर्चिंग ऑपरेशन युद्धपातळीवर सुरूच आहे. ढिगाऱ्याखाली उर्वरित अडकलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी यंत्रणा शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Edited By - Priya Dixit 

ALSO READ: मोशी कचरा डेपो अपघातात ५० तासांनंतरही ८ कामगार ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरूच


© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.