आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 जुलै 2026
esakal July 14, 2026 10:45 AM

पंचांग -

मंगळवार : निज ज्येष्ठ कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, सूर्योदय ६.०७ सूर्यास्त ७.१३, चंद्रोदय सकाळी ६.४१, चंद्रास्त सायंकाळी ७.२७, दर्श अमावास्या, अमावास्या समाप्ती दुपारी ३.१४, भारतीय सौर आषाढ २३ शके १९४८.

दिनविशेष -

  • २००३ - भारताचा नवोदित बुद्धिबळपटू संदीपन चंदा याने ग्रॅंडमास्टर किताब मिळविला आहे. हा प्रतिष्ठेचा किताब मिळविणारा तो भारताचा नववा खेळाडू ठरला आहे.

  • २००४ - तुर्कस्तानातील इंस्तंबूल येथे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष व संसद सदस्य डॉ. के. कस्तुरीरंगन यांना ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर फोटोग्रामेट्री ॲन्ड रिमोट सेन्सिंग’ या संस्थेने मानाचे ‘ब्रॉक मेडल’ प्रदान केले. हे पदक मिळालेले ते आशिया खंडातील पहिलेच शास्त्रज्ञ आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.